बीड -पेठ बीड भागातील एका छोट्या व्यापाऱ्याने सावकाराच्या जाचाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. हा सावकार राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याने पोलीस गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याची चर्चा आहे. मयत व्यापाऱ्याच्या खिशात सहा पानी चिठी सापडली असून त्यात सावकारांचे नाव असल्याचे कळते. पोलीस काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
खाजगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून यापूर्वी देखील अनेकांनी आत्महत्या केली आहे. असाच ऐक प्रकार पेठ बीड भागातील काळा हनुमान ठाणा या ठिकाणी उघडकीस आला आहे.
पेठ बीड भागातील व्यापारी रामा फटाले यांनी खाजगी सावकाराकडून कर्ज घेतले होते. पेठ बीड मधील पुलानजीक त्यांचे कपड्याचे दुकान होते. यासाठी त्यांनी सावकाराकडून कर्ज घेतले होते. त्यापोटी चेक देखील दिले होते. कर्ज फेडल्यानंतर चेक परत मागितले असता खाजगी सावकाराने आणि त्याच्या पत्नीने चेक परत करण्यास नकार देत या व्यापाऱ्याला धमकावले तसेच पैशासाठी तगादा लावला.
खाजगी सावकाराकडून होत असलेला मानसिक छळ सहन न झाल्याने या व्यापाऱ्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तत्पूर्वी त्याने सहा पाणी सुसाईड नोट लिहून ठेवली असून त्यामध्ये खाजगी सावकार त्याची पत्नी आणि इतरांचा उल्लेख केला आहे.
हा सावकार सत्ताधारी महायुती मधील एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असून डॉक्टर म्हणून मिरवत असल्याचे देखील माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलिसांनी आरोप आरोपीला अटक करण्याऐवजी त्याच्यासोबत ऍडजेस्टमेंट सुरू केली असल्याची चर्चा जोरात आहे.
या प्रकरणात सहा पाणी चिट्ठी आढळून आल्यानंतर आणखी कुठला सबळ पुरावा पोलिसांना अपेक्षित आहे अशी देखील चर्चा आहे. सामाजिक कार्याचा आव आणत खाजगी सावकारकी करणाऱ्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर तातडीने गुन्हा दाखल करून मयत व्यापाऱ्याच्या कुटुंबाला पोलिसांनी न्याय द्यावा अशी मागणी होत आहे.












Leave a Reply