नागपूर -नागपूर जिल्ह्यातील एक हजार शिक्षकांच्या नियुक्ती बाबत तपासणी पूर्ण झाली असून त्यातील जवळपास 649शिक्षकांची नियुक्ती बोगस असल्याचे उघड झाले आहे. या शिक्षकांकडून प्रत्येकी किमान वीस लाख रुपये याप्रमाणे शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम प्रशासन, संस्थाचालक यांनी गोळा केल्याची माहिती तपासात उघड झाली आहे.
छत्रपती संभाजी नगर येथील शिक्षण मंडळाच्या सचिव व तत्कालीन शिक्षण उपसंचालक वैशाली जामदार यांना प्रोडक्शन वॉरंटवर अटक करण्यात आली. एसआयटीने त्यांना न्यायालयात हजर केले असता 26 मे पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली. याशिवाय पूर्वीच एसआयटीच्या ताब्यात असलेले लक्ष्मण उपासराव मंघाम सोमवार 25 मे पर्यंत कोठडीत असून माजी शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी 29 मे पर्यंत पोलीस कोठडीत आहेत.
SIT स्थापन झाल्यापासून तत्कालीन शिक्षण उपसंचालक छत्रपती संभाजीनगर शिक्षण मंडळ सचिव वैशाली जामदार, चिंतामण वंजारी यांच्यासह चार जणांना अटक करण्यात आली. आता वाघमारेंना अटक झाल्यानंतर या घोटाळ्यासंदर्भात आणखी मोठे खुलासे होऊ शकतील, अशी माहिती एसआयटी प्रमुख पोलिस उपायुक्त राहुल मदने यांनी शनिवारी (दि.२४) दिली.
नागपूर विभागाच्या तत्कालीन शिक्षण उपसंचालक वैशाली जामदार यांना छत्रपती संभाजी नगरमधून अटक करण्यात आली आहे. वैशाली जामदार यांच्या अटकेनंतर या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या शिक्षण विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या १५वर पोहोचली आहे. पोलिस उपायुक्त राहुल मदने यांनी दिलेल्या माहितीनुसार बोगस शिक्षक भरतीचा कारभार सन २०१० पासूनच सुरू होता. तेव्हापासून जवळपास १ हजार शिक्षकांना नियुक्त्या देण्यात आल्याची बाब सायबर आणि पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात समोर आली आहे.
650 नियुक्त्यावर प्रश्नचिन्ह
१ हजार नियुक्त्यांपैकी फक्त ३५० नियुक्त्या रीतसर प्रक्रिया पूर्ण करून देण्यात आल्या आहेत. उर्वरित नियुक्त्यांसंदर्भात योग्य प्रक्रिया न पाळताच शालार्थ आयडी देण्यात आल्या. त्यामुळे जवळपास ६५० शिक्षकांच्या नियुक्त्या या बोगस असण्याची दाट शक्यता आहे. या सर्व ६५० बोगस नियुक्त्यांबद्दल शालार्थ आयडी तयार करून शिक्षकांचे वेतनही सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे बोगस शालार्थ आयडीच्या माध्यमातून शासनाला मोठे आर्थिक नुकसान पोहोचवण्यात आल्याची बाब समोर आली आहे. प्राथमिक दृष्या या प्रकरणात मोठा घोटाळा झाल्याचे दिसून येत आहे, असेही एसआयटीचे प्रमुख राहुल मदने यांनी स्पष्ट केले.
नागपूर जिल्ह्यात जो काही घोटाळा उघडकीस आला आहे त्यात किमान पंधरा आणि कमाल पंचवीस लाखाचा रेट लावण्यात आला होता. 650 शिक्षकांचे मिळून जवळपास 109 कोटी रुपये उपसंचालक, शिक्षणाधिकारी, संस्थाचालक आणि पे युनिट च्या अधिकाऱ्यांनी घशात घातल्याचे तपासात उघड झाले आहे.
नागपूर प्रमाणेच मराठवाड्यात देखील शिक्षक आणि कर्मचारी यांच्या बोगस भरतीचे कॉन्ट्रक्ट घेण्यात आले होते, बीडच्याच व्यक्तीने हा सगळा प्रकार मॅनेज केल्याची चर्चा आहे. प्रति शिक्षक वीस ते पंचवीस लाख याप्रमाणे बीड जिल्ह्यात देखील किमान शंभर ते दोनशे कोटीची शासनाची फसवणूक करण्यात आल्याची माहिती आहे.
Leave a Reply