शरद पवारांचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या बॅनरमुळे एकत्रिकरणावर शिक्कामोर्तब!
बीड – अडीच वर्षांपूर्वी वेगळे झालेले आणि मागील महिनाभरापासून एकत्रिकरणाची चर्चा सुरु असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचे जाहिर आभार मानले आहेत. बीड शहराच्या वेगवेगळ्या भागात आ क्षीरसागर यांनी लावलेले बॅनर चर्चेचा विषय ठरले आहेत. काका पुतण्याच्या एकत्रिकारणाचा पुढील अध्याय म्हणून या बॅनर बाजी कडे पाहिले जातं आहे.
बीडचे अ्क संदीप क्षीरसागर यांनी बीड शहरातील बस्सस्थानक परिसरात उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे जाहिर आभार असा मजकूर असणारे बॅनर लावले आहेत. या बॅनर वर शरद पवार, अजित पवार आणि संदीप क्षीरसागर यांचे फोटो आहेत.
बीड मतदारसंघसाठी विमानतळ, नवीन आयटीआय, तारांगण, नवीन एम आय डी सी, जिल्हा रुग्णालयाच्या विस्तारासाठी निधी, रस्ते, पाणी, वीज यासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केल्याबद्दल दादांचे आभार मानन्यात आले आहेत.
राज्याच्या राजकारणात अडीच वर्षांपूर्वी मोठा राजकीय भूकंप झाला होता. अजित पवार यांनी काकाची साथ सोडत भाजप, सेनेसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी पवारांचे चाळीस आमदार दादासोबत गेले होते. मात्र बीडचे आ संदीप क्षीरसागर मात्र शरद पवार यांच्यासोबतच राहिले होते.
संदीप यांच्या या निर्णयामुळे त्यांना गेल्या अडीच वर्षात निधी असो कि नवीन कामांची मंजुरी याबाबत प्रचंड त्रास सहन करावा लागला होता. विधानसभा निवडणुकीपूर्वी देखील संदीप क्षीरसागर यांनी प्रवेश करावा यासाठी अजित पवार यांनी प्रयत्न केले होते. परंतु विजयी झाल्यानंतर देखील आ क्षीरसागर यांनी सिनियर पवार यांच्याप्रति आपली निष्ठा कायम ठेवली होती.
याचा फटका देखील त्यांना आणि पर्यायाने बीड मतदार संघातील नागरिकांना सहन करावा लागला. महिना महिना पाणी मिळतं नसताना आणि अजित पवार पालकमंत्री असताना देखील वीज जोडणीसाठी निधी नामंजूर करण्यात आला होता.
दरम्यान नुकत्याच झालेल्या जिल्हा वार्षिक नियोजन बैठकीत पालकमंत्री म्हणून अजित पवार यांनी बीड मतदार संघांसाठी मोठे निर्णय घेत भरघोस निधी दिला. त्याबद्दल त्यांचे आभार मानणारे बॅनर संदीप क्षीरसागर यांनी लावले आहेत.
राज्याच्या राजकारणात मागील महिनाभरपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चानी जोर धरला आहे. खा सुप्रिया सुळे असोत कि स्वतः शरद पवार अथवा अजित पवार यांचे गेल्या काही दिवसातील स्टेटमेंट एकत्रिकरणाची चाहूल देणारे आहेत. अशात बीडचे शरद पवार गटाचे आ संदीप क्षीरसागर यांनी लावलेले आभाराचे बॅनर या एकत्रिकारणावर शिक्कामोर्तब करणारे आहेत अशी चर्चा सूरु झाली आहे.
Leave a Reply