बीड -मजूर संस्थेचे नूतनिकरण करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभाग क्र 2 मधील वरिष्ठ लिपिकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले. कृष्णा मुंडे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
बेलगाव येथील तक्रारदार यांच्या मजूर संस्थेचे नूतनिकरण करून अ वर्ग वर्गीकरण करण्यासाठी बीडच्या सार्वजनिक बांधकामं विभाग क्र 2 मधील वरिष्ठ लिपिक कृष्णा वसुदेव मुंडे याने पाच हजार रुपये लाचेची मागणी केली.
याबाबत तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर सापळा रचण्यात आला.मुंडे याला पाच हजाराची लाच घेताना कार्यालयात रंगेहाथ पकडण्यात आले.
Leave a Reply