बोगस कामांचा आ क्षीरसागरांकडून पर्दाफाश!
बीड – बीड विधानसभा मतदारसंघात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच नरेगाच्या अंतर्गत अनेक निकृष्ट दर्जाची आणि बोगस कामे झाली आहेत. शासकीय अधिकारी यांच्याशी संगनमत करून अनेकांनी यामध्ये मोठा भ्रष्टाचार केलेला आहे. या सर्व प्रकरणांचे आता आ.संदीप क्षीरसागर यांनी पोस्टमार्टम करायला सुरुवात केली आहे, म्हणजेच झालेल्या कामांची स्वतः आ.संदीप क्षीरसागर जाऊन पाहणी करत आहेत.
नरेगा अंतर्गत झालेली कामे अत्यंत निकृष्ट आणि काही ठिकाणी तर चक्क बोगस असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
बीड विधानसभा मतदारसंघातील बीड आणि शिरूर कासार तालुक्यात अनेक ठिकाणी बोगस कामे झाल्याचा तक्रारी होत्या. अनेक कामे हि अतिशय निकृष्ट झालेली आहेत. काही विशिष्ट लोक, ठेकेदार आणि शासकीय अधिकारी यांनी संगनमत करून भ्रष्टाचारी पॅटर्न राबवला आहे. या गंभीर विषयाची दखल घेत आ.संदीप क्षीरसागर यांनी झालेल्या बोगस आणि निकृष्ट कामांची पाहणी आणि चौकशी सुरु केली आहे.
बुधवारी (दि.१४) रोजी बीड तालुक्यातील नाळवंडी आणि काळेगाव हवेली या गावांमध्ये आ.संदीप क्षीरसागर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत जाऊन झालेल्या निकृष्ट आणि बोगस कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. आता बीड मतदार संघात झालेल्या नरेगाच्या प्रत्येक बोगस आणि निकृष्ट कामाची मी स्वतः जाऊन प्रत्यक्ष पाहणी करणार आहे. शासनाच्या निधीची पद्धतशीर विल्हेवाट लावण्याचे काम करणाऱ्या प्रत्येकावर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आ.संदीप क्षीरसागर यांनी सांगितले आहे.
Leave a Reply