नवी दिल्ली -पहलगाम अतिरेकी हल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सुरु झालेले युद्ध अखेर थांबले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी hi माहिती एक्स वरून दिली. त्यानंतर भारताच्या संरक्षण मंत्रालयाने याबाबत अधिकृत घोषणा केली. यापुढे भारतात कोणत्याही प्रकारे अतिरेकी कारवाई झाल्यास ते युद्ध समजले जाईल असेही भारताने स्पष्ट केले आहे.
पाकिस्तानचे डीजीएमओ यांनी आज दुपारी ३:३५ वाजता भारताच्या डीजीएमओशी चर्चा केली. त्यानंतर सायंकाळी पाचवाजेपासून दोन्ही बाजूंनी कारवाया थांबल्याचेमिस्त्री यांनी सांगितले. दोन्ही देशांचे डीजीएमओ १२ मे रोजी दुपारी १२ वाजता पुन्हा चर्चा करतील असेही मिस्त्री यांनी यावेळी सांगितले.
मिस्त्री यांच्या घोषणेपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांनी युद्धविरामास सहमती केला आहे. याबाबत ट्रम्प यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. भारत आणि पाकिस्तानने युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. हे जाहीर करताना त्यांना आनंद होत असल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. मात्र, अद्याप याबाबत भारताकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नसून, संध्याकाळी परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद होणार आहे. यात याबाबत काय घोषणा केली जाते हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. तर, पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांनी भारत-पाकिस्तानदरम्यान तात्काळ शस्त्रसंधीची सहमती दर्शवल्याचा दावा केला आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हणाले की, भारत आणि पाकिस्तानने युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, अमेरिकेच्या मध्यस्थीने रात्रीच्या दीर्घ वाटाघाटींनंतर, मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. दोन्ही देशांचे अभिनंदन.
Leave a Reply