News & View

ताज्या घडामोडी

भारताचा पाकिस्तानवर हल्ला!पन्नास ठिकाणी ड्रोन अटॅक!

नवी दिल्ली -ऑपरेशन सिंदूर नंतर भारतावर आक्रमन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तान ला भारताने चांगलीच अद्दल घडवली आहे. तब्बल पन्नास ठिकाणी ड्रोन ने हल्ला करून भारताने पाकची रडार यंत्रणा उध्वस्त केली आहे.

पाकिस्तानने पंजाब, गुजरात आणि राजस्थानमधील भारतीय लष्कराच्या तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे भारतीय वायूदलाने ड्रोनचा वापर करुन थेट पाकिस्तानच्या हवाई सुरक्षा यंत्रणेवरच स्ट्राइक केला. लाहोरमधील पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम आणि रडार यंत्रणा उद्ध्वस्त केली आहे. तसेच पुन्हा असा प्रयत्न केल्यास भारत सुट्टी देणार नाही असा इशाराही पाकिस्तानला देण्यात आला आहे.

पाकिस्तान भारतावर मोठा हल्ला करण्याच्या प्रयत्नात होता. भारतातील तब्बल १५ शहरांना टार्गेट करण्याचा पाकिस्तानचा प्लॅन होता. पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथाला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंढिगड, नल, भूज यासह उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हा हल्ला उधळून लावण्यासाठी भारताने ड्रोन हल्ला करुन पाकिस्तानची HQ-9 रडार यंत्रणा उद्ध्वस्त केली. खुद्द भारतीय लष्कराकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. पाकिस्तानच्या १२ शहरात असे एकूण ५० ड्रोन हल्ले करण्यात आले आहेत. भारताकडून हॅरोप ड्रोनचा वापर करण्यात आला.

पाकिस्तानने भारतावर केलेल्या सर्व हल्ल्यांना इंटिग्रेटेड काउंटर यूएएस ग्रिड आणि एअर डिफेन्स सिस्टमने यशस्वीरित्या निष्प्रभ केले. पाकिस्तानने ज्या पद्धतीने हल्ल्याचा प्रयत्न केला त्याच पद्धतीने जशास तसं उत्तर भारताने दिलं. पाकिस्तानच्या या हल्ल्यांचे अवशेष अनेक ठिकाणी सापडत आहेत. पाकिस्तानी हल्ल्याचा पुरावा म्हणून त्याची नोंद घेतली जात आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तान मध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे. नागरिकांची पळापळ सुरु आहे. पाकिस्तान मध्ये प्रमुख शहरात सायरन वाजवले जात आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांनी भारताच्या या ड्रोन हल्ल्यानंतर पाक लष्करासोबत तातडीची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत ते काय भूमिका घेतात याकडे पाक जनतेचे लक्ष्य आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *