बीड -जिल्हाधिकारी कारागृहात असलेल्या एका बड्या पार्टीच्या कुटाण्यामुळे एक सिनियर जेलर वर सस्पेंड होण्याची वेळ आली. वरिष्ठ कार्यालयाच्या चौकशी मध्ये बीडच्या जेलमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्याने या सिनियर वर ठपका ठेवून त्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्यभरातील कोणत्याही जेलमध्ये कैद्याना रोज वापरात येणारे काही सामान खरेदी करण्यासाठी कँटीन ची व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रत्येक कैद्याला महिन्यासाठी किती खरेदी करता येईल याची मर्यादा घालून दिलेली आहे.
बहुतांश ठिकाणी कागदोपत्री का होईना ही मर्यादा पाळल्याचे दाखवले जाते. प्रत्येक जेलमध्ये अनेक डॉन, दादा, भाई, आका असतातच. त्यांचे पंटर किंवा गॉडफादर हे आपल्या जेलमधील सहकाऱ्याची नीटनेटकी व्यवस्था करण्यासाठी फिल्डिंग लावतात.
बीडच्या जेलमध्ये देखील असे अनेक कैदी आहेत ज्यांची व्यवस्था करण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. या व्यवस्थेमध्ये एकाच नावावर मोठ्या प्रमाणावर कँटीन ची खरेदी झाल्याचे उघड झाले.
याबाबत तक्रार झाल्यानंतर चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना दुरुत्तरे दिल्याने सिनियर जेलरवर कारवाई झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Leave a Reply