News & View

ताज्या घडामोडी

विवेक जॉन्सन यांनी स्वीकारला पदभार!

बीड- बीड जिल्हयाचे जिल्हाधिकारी म्हणून विवेक जान्सन यांनी आज पदभार स्विकारला. श्री. जॉन्सन 2018 च्या तुकडीचे सनदी अधिकारी आहेत. येथे बदलून येण्यापूर्वी ते चंद्रपूर येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते.


अभियंता पदवी नंतर ते प्रशासकीय सेवेत आहेत. त्यांनी परिविक्षाधिन कालावधीत येथील माजलगाव नगर परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर काम केलेले आहे.
त्यांनी पदभार स्विकारल्यावर निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी त्यांचे प्रशासनातर्फे स्वागत केले. यावेळी महसूल विभागाचे अधिकारी तहसीलदार नरेंद्र कुलकर्णी तसेच इतरांची उपस्थिती होती.
*अल्पपरिचय*

• पलक्कड येथील एनएसएस महाविद्यालयातून यांत्रिकी अभियंता परिक्षा उत्तीर्ण
• 2016 साली भारतीय महसूल सेवा (आयआरएस) व नंतर 2018 साली भारतीय प्रशासन सेवेत रुजू
• स्मार्ट आरोग्य केंद्र उभारणीत एकूण 32 आरोग्य केंद्र अद्यावत केले.
• मिशन ‘सक्षम’अंतर्गत खगोल प्रयोगशाळा तसेच 8 विज्ञान उद्यानांची उभारणी
• जिवनोन्नती अंतर्गत बचतगटांसाठी 10 विशेष मॉलची उभारणी
• ग्रामसडक अंतर्गत 5000 किमी रस्ते बांधणी
• ग्रामीण भागात पर्यटन विकास कार्य तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेस गती देण्यासाठी 16 कृषी माल गोदामांची उभारणी
पुरस्कार
• उल्लेखनीय कार्याबद्दल शासनाच्या बालस्नेही पुरस्काराचे मानकरी
• लोकाभिमूख कार्याबद्दल ‘महाराट्रीयन ऑफ द इअर 2023’ पुरस्काराने गौरव
• ग्रामीण जीवनात,अर्थव्यवस्था आणि मुलभूत सुविधा उभारणीसाठी ‘स्कॉच पुरस्कार’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *