विवेक जॉन्सन नवे जिल्हाधिकारी!
बीड -लोकसभा निवडणुकीनंतर बीडमध्ये रुजू झालेले जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची अचानक बदली करण्यात आली आहे. अवघ्या दहा महिन्यात पाठक यांची बदली झाली असून नवे जिल्हाधिकारी म्हणून विवेक जॉन्सन हे रुजू होणार आहेत.
बीडचे जिल्हाधिकारी म्हणून अविनाश पाठक हे जुन 2024 मध्ये रुजू झाले होते. त्याआगोदर त्यांनी वर्षभर बीडचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून देखील काम पाहिले होते. पाठक यांच्या कार्यकाळात विधानसभा निवडणूक कुठलेही गालबोट न लागता पार पडली.
थेट लोकांशी संवाद साधणारा, शांत अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. मंगळवारी सायंकाळी त्यांच्या बदलीचे आदेश आले. त्यांच्या जागी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे सिइओ विवेक जॉन्सन यांची नियुक्ती झाली आहे.
Leave a Reply