News & View

ताज्या घडामोडी

बडतर्फ कासले विरुद्ध पोलिसात तक्रार!

बीड – बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले याचा आणखी एक कारनामा उघड झाला आहे. रणजित कासले स्वतःच्या खात्यावर दहा लाख रुपये धनंजय मुंडे यांच्या माणसांनी पाठवले असे सांगत होता, ते पैसे मुळात अंबाजोगाई येथील संत बाळू मामा कन्स्ट्रक्शन चे मालक सुदर्शन काळे यांनी पाठवले असल्याचे उघड झाले आहे.याबाबत आता सुदर्शन काळे यांनीच स्वतः पोलिसात पैसे दिल्याच्या पुरावा सहित तक्रार दाखल केली आहे.

रंजीत कासले हा पोलीस उपनिरीक्षक असताना मागील वर्षी अंबाजोगाई येथे कार्यरत होता, त्या काळात आपली त्याच्याशी ओळख झाली. डिसेंबर 2024 मध्ये रणजीत कासले याने आपल्या लातूर येथे शिक्षण घेत असलेल्या मुलाच्या फीची अडचण असल्याचे सांगत दहा लाख रुपयांची उसनवारी ने मागणी केली.

एका कामाचे बिल आल्यानंतर मी त्यांना त्यांच्या ॲक्सिस बँकेच्या वैयक्तिक खात्यावर ते दहा लाख रुपये पाठवले. विशेष म्हणजे त्यावेळी त्यांनी मला दुसऱ्या एका अनोळखी व्यक्तीच्या खात्यावर पैसे पाठवण्याचा आग्रह केला होता मात्र मी तसे न करता वैयक्तिक त्यांच्याच बँक खात्यावर पैसे पाठवले. त्यांनी लवकरच ते पैसे परत देतो, असे सांगितले होते. साधारण दीड ते दोन महिने उलटल्यानंतर मी त्यांना पैशाची परत मागणी केल्यावर त्यांनी टाळाटाळ केली.

माझे पैसे मला गरजेच्या वेळी परत न दिल्यास मी त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले, किंवा त्यांनी गुजरात मधून मला काही रक्कम पाठवली. तसेच सायबर ठाण्यातील गिरी नामक कर्मचाऱ्यांच्या हाताने दोन लाख रुपये, असे तीन वेळा मिळून साडे सात लाख रुपये परत दिले आहेत. तर उर्वरित अडीच लाख रुपये परत मिळवून द्यावेत, अशी मागणीही काळे यांनी आपल्या तक्रारीत केली आहे. सुदर्शन काळे यांनी आपल्या तक्रारी सोबत कासले याला पैसे पाठवल्याचे पुरावे देखील जोडले आहेत. या तक्रारीची दखल घेऊन पोलीस प्रशासन कासले वर काय कारवाई क याकडेही आता लक्ष लागले आहे.

बडतर्फ कासलेचे आरोप निराधार!जिल्हा प्रशासनाचा दावा!

रणजित कासले याने परळी विधानसभा निवडणुकीतील गैरप्रकारबाबत केलेल्या आरोप संदर्भात जिल्हा प्रशासनाने निवडणूक आयोगाला पाठवलेल्या अहवालत स्पष्ट करण्यात आले आहे की बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले हा निवडणूक प्रक्रियेमध्ये परळी विधानसभा मतदार संघाशी संबंधित कोणत्याही ड्युटीवर नव्हता. मतदान केंद्र, स्ट्रॉंग रूम किंवा मतमोजणी केंद्र यापैकी कुठेही रणजीत कासले याची ड्युटी नियुक्त करण्यात आलेली नव्हती.

निवडणूक कालावधीत व विशेष करून ईव्हीएम आणि स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेसाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार केंद्र व राज्य शासनाची मिळून तीन स्तरीय सुरक्षा तैनात करण्यात आली होती. अंतर्गत सुरक्षेमध्ये पहिल्या स्तरावरती केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान थेट evm मशीन जवळ तैनात होते. दुसऱ्या स्तरात इमारतीच्या परिघावर राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तर तिसऱ्या बाह्य स्तरांमध्ये जिल्हा पोलीस दलाचे कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते.

मशीनच्या जवळ असणारे पहिले दोन स्तर हे केंद्रीय व राज्य राखीव पोलीस दलांकडून पुरवले गेल्याने त्यामध्ये स्थानिक पोलिसांच्या हस्तक्षेपाचा प्रश्नच येत नाही. त्याचबरोबर निवडणूक काळात रणजीत कासले याची निवडणूक प्रक्रियेशी संबंधित कोणतीही नियुक्ती करण्यात आली नव्हती, त्या काळात तो बीड सायबर पोलीस ठाण्यात कार्यरत होता. असा स्पष्ट अहवाल पोलीस अधीक्षक बीड यांनी सादर केला असून, ईव्हीएम मशीन सील करताना तसेच उघडताना उमेदवारांचे प्रतिनिधी तसेच निवडणूक निरीक्षक उपस्थित होते. पूर्ण स्ट्रॉंग रूम 24 तास सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणी खाली होत्या तसेच याबाबत किंवा ईव्हीएम च्या छेडछाडी बाबत कुठेही तक्रार आलेली नाही.

रंजीत कासले हे सातत्याने समाज माध्यमावर बेजबाबदार आणि अयोग्य विधाने करत आहेत. राज्यातील सन्माननीय मंत्री, लोकप्रतिनिधी त्याचबरोबर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांविषयी अनेक वेळा बदनामीकारक आणि निराधार वक्तव्य त्यांनी केले असून, त्यांनी स्वतःच आपण अनेकदा दारूच्या नशेमध्ये विधान करत असल्याचे मान्य केलेले आहे. रणजित कासले यांचा अपराध हा वैयक्तिक शिस्तभंग पुरता मर्यादित नसून सार्वजनिक व्यवस्था आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने देखील गंभीर असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या अहवालात म्हटले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *