बीड-लेखा परीक्षणाच्या धनादेशाची मंजुरी घेण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच मागणाऱ्या शाखा व्यवस्थापकाच्या नातेवाईकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.ही कारवाई बीडच्या जिल्हा बँकेच्या मुख्य शाखेत घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
प्रथमेश उर्फ बाळू ठोंबरे असे लाच घेणाऱ्या आरोपीचे नाव आहे.त्याचे काका हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेत व्यवस्थापक आहेत.माजलगाव तालुक्यातील खेर्डा येथील सेवा सहकारी सोसायटीच्या लेखा परीक्षण अहवालाच्या चेकची मंजुरी मिळावी यासाठी ठोंबरे याने वीस हजार रुपयांची लाच मागितली होती.
त्याच्या या कारभाराबाबत काकाला कसलीच कल्पना नव्हती.प्रथमेश ठोंबरे याला बँकेच्या मुख्य शाखेत वीस हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
Leave a Reply