News & View

ताज्या घडामोडी

माफियांना मातीत घालणार!कोणाच्याही पाया पडू नका -अजित पवार!

बीड -वाळू माफिया, रेती माफिया, भूखंड माफिया यांना मातीत घातल्याशिवाय शांत बसणार नाही असा ईशारा देतानाच कोणाच्याही पाया पडू नका, पाया पडण्यासारखे लोक राहिले नाहीत असा म्हणत उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले.

बीडच्या दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाट्यगृहात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात उपस्थित कार्यकर्त्यांना खडे बोल सुनावले.

बीडमध्ये वाळू माफिया, राख माफिया, भूखंड माफिया, गुटखा माफिया, खंडणीखोर यांनी डोके वर काढले आहे. मात्र आपण पालकमंत्री आहोत त्यामुळे यापुढे हे चालू देणार नाहीत. या सगळ्या माफियांना मातीत घातल्याशिवाय गप्प बसणार नाही.

रस्त्याचे काम मंजूर झाल्यावर आधीचे फोटो, नंतरचे फोटो काढा, डेप्युटी इंजिनियर, एकझ्यूकीटिव्ह इंजिनियर यांना दाखवा. काम न करता बिल काढाल तर याद राखा, बोगस काम करणाऱ्यांना मातीत घालू असा ईशारा अजित पवार यांनी दिला.

अलीकडच्या काळात हार तुरे, शाल, श्रीफळ देऊन स्वागत करण्याची पद्धत वाढली आहे. हे करताना पाया पडण्याची पद्धत सुरु झाली आहे. मात्र पाया पडण्यासारखे पाय अन नेते राहिले नाहीत. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा, वसंतराव नाईक, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्यासारखे युगपुरुष आहेत. त्यांना अभिवादन करा.

या कार्यक्रमापूर्वी अजित पवार यांनी हेलिपॅड वर उतरताच एसपी नवनीत कावत यांच्यासह अधिकाऱ्यांना चांगलेच झापले. थेट कार्यकर्ते हेलीकोप्टर पर्यंत कसेकाय येतात. जरा शिस्त लावा. माझ्या पीएस ला बोलून आजच्या बैठकीत काय काय विषय आहेत ते समजून घ्या. नंतर एनवेळी माहिती नाही असा उत्तर चालणार नाही असेही पवार यांनी म्हटले. यावेळी एसपी कावत, जिल्हाधिकारी अविनाश पाठक हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *