शस्त्र परवान्याच्या फाईलवर एसपी कावत यांनी झोपेत सह्या केल्या का?
बीड -ज्या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकारणाचे पडसाद गेल्या तीन महिन्यापासून राज्यात उमटत आहेत त्या प्रकरणातील आरोपी विष्णू महादेव चाटे याच्यावर एकही गुन्हा नोंद नाहीये असा जावई शोध बीडचे हुशार, चाणक्ष पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी लावला आहे. चाटे याने मागितलेल्या शस्त्र परवान्या च्या फाईलवर कावत यांनी चाटे याचे चारित्र्य चांगले असल्याचे सांगत त्यांच्यावर कोणताही गुन्हा नसल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार देशमुख हत्येनंतर महिनाभराने झालेला आहे अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या 9 डिसेंबर 2024 रोजी झाली. यामध्ये वाल्मिक कराड, सुदर्शन घुले याच्यासह विष्णू महादेव चाटे याचा आरोपी म्हणून समावेश आहे. या प्रकरणात नागपूर च्या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन एसपी अविनाश बारगळ यांची तडकाफडकी बदली करत पोलिसांवर कारवाई केली होती.
हा सगळा घटनाक्रम घडून गेल्यानंतर तातडीने 22 किंवा 23 डिसेंबर रोजी नवनीत कावत यांनी पदभार घेतला. त्यानंतर त्यांनी या प्रकारणाची सखोल माहिती घेतली.
दरम्यान या घटनेला तीन महिने महिने उलटून गेल्यानंतर एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. देशमुख हत्या कांडातील आरोपी असलेल्या विष्णू महादेव चाटे याने शस्त्र परवाना मिळावा म्हणून बीडच्या पोलीस अधीक्षक यांच्याकडे अर्ज केला होता.
या अर्जावर पडताळणी केल्यानंतर एसपी ऑफिसने त्यावरील गंभीर स्वरूपाचे गुन्हे पाहता त्याची माहिती देणे आणि प्रस्ताव नाकारणे अपेक्षित होते.मात्र बीडचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी मात्र विष्णू चाटे याच्यावर कोणत्याही प्रकारचा एकही गुन्हा नाही आणि त्यांचे चारित्र्य स्वच्छ आहे असा अहवाल दिला आहे.
एसपी कावत यांनी जो अहवाल दिला आहे तो 9 जानेवारी 2025 रोजी दिलेला आहे. म्हणजे देशमुख यांची हत्या झाल्यानंतर बरोबर एक महिन्याने. याचा अर्थ सदरील अहवाल चुकीने किंवा घायगडबडीने दिला आहे असे नाही.
एवढ्या संवेदनशील आणि गाजलेल्या प्रकरणातील आरोपीवर एकही गुन्हा नाही हा जावई शोध एसपी कावत यांनी कशाच्या आधारावर लावला. दिवसाढवल्या खून करून फरार होणारे आरोपी हे कावत यांच्या नजरेत गुन्हेगार नाहीत का? त्यांना पोलीस अधीक्षक दर्जाचा अधिकारीच जर क्लीनचीट देत असेल तर तपास आणि न्याय कसा मिळणार अशी चर्चा होतं आहे.
Leave a Reply