पुणे – स्वारगेट येथील शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार करून फरार झालेल्या आरोपी दत्तात्रय गाडे याने दोनवेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता तसेच त्याच्या जवळ रोगर ची बाटली सापडल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.
पुण्यातील स्वारगेट बसस्थानक परिसरात असलेल्या शिवशाही बसमध्ये दत्तात्रय गाडे याने एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार केले. त्यानंतर तो फरार झाला.
दत्तात्रय गाडे पोलिसांना गुंगारा देत असताना, गणेश गव्हाणे आणि त्यांचे सहकारी त्याचा पाठलाग करत होते. एका विहिरीजवळ दत्तात्रय बसलेला दिसताच, गव्हाणे यांनी गाडीचा लाईट त्याच्यावर टाकला आणि त्याला पकडण्यासाठी धाव घेतली.
गव्हाणे यांनी पकडल्यावर दत्तात्रय म्हणाला, ‘मला माझ्या मुलासोबत बोलू द्या, मी उद्या हजर होतो.’ धक्कादायक बाब म्हणजे, त्याच्या हातात ‘रोगर’ या औषधाची बाटली होती. हे विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा त्याचा प्रयत्न असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गव्हाणे यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ दत्तात्रयच्या हातातील ‘रोगर’ची बाटली हिसकावून घेतली, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला. त्यानंतर त्यांनी तातडीने पोलीस पाटलांना फोन करून घटनेची माहिती दिली, तसेच दत्तात्रयचे त्यांच्याशी बोलणे करून दिले.
माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी दत्तात्रयला ताब्यात घेतले. या घटनेमुळे, आरोपीला पकडण्यात केवळ पोलिसांचेच नाही, तर सतर्क नागरिकांचेही योगदान महत्त्वाचे ठरले, हे दिसून येते.
या प्रकरणात आता पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून 45 तासानंतर पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. कधी ऊसाच्या शेतात तर कधी कॅनोलमध्ये तो लपून बसला होता. मात्र, यानंतर आता दत्तात्रय गाडेच्या नको नको त्या कहाण्या समोर येताना दिसत आहे.
आरोपीचा शर्ट पोलिसांच्या हाती लागला होता. त्यामुळे श्वानपथकाच्या मदतीने आरोपी पोलिसांचा शोध सुरू केला, तो लपला होता त्या गावात पोलिसांनी अनाउन्समेंट करायला सुरु केली होती. काही गावकऱ्यांनी आरोपीला पकडण्यासाठी मदत केल्याचा दावा केला आहे. मात्र त्यात किती तथ्य आहे ते पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळाली नाही.
दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असलेल्याचं समोर आलं आहे. हा आरोपी दिवसा गावात रहायचा. दिवसभर गावभर हिंडायचा. पण रात्री पासचा वापर करून शिवाजीनगर, स्वारगेट, अहिल्यानगर, शिरुर एसटी स्टॅडवर फिरत असायचा. असहाय्य तरुणींची शिकार दत्ता गाडे करायचा. काही दिवसांपूर्वी एका मुलीला या आरोपीनं असंच जाळ्यात ओढलं होतं, मात्र ती मुलगी सावध झाली आणि त्यामुळे आरोपीचा डाव फसला होता, अशी माहिती समोर आली आहे.
महेश बहिरट नावाच्या व्यक्तीच्या घरी रात्री 10.30 वाजता आला. त्याने सांगितलं, मला सरेंडर करायचं आहे. आता मला सहन होत नाही. माझ्याकडून चूक झाली, असं त्याने या व्यक्तीला सांगितलं. त्यानंतर तो पुन्हा उसाच्या शेतात गेला. तिथून तो रात्री पाण्याच्या कॅनालच्या बाजूला झोपलेला आढळून आला.
Leave a Reply