परळी- 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अनेकांचा पराभव झाला मात्र गेल्या चार वर्षात त्यातील दोन डझन लोकांना आमदार आणि खासदार बनवण्यात आले मात्र आपल्याला सातत्याने का दूर ठेवण्यात आले नेमका आपलं कुठे चुकतंय हे आपण एकदा थेट अमित शहा यांना जाऊन विचारणार आणि त्यानंतर मीडिया आणि जनतेसमोर येऊन आपली स्वतःची भूमिका ठोसपणे मांडणार असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपण पक्षावर नाराज असल्याच्या चर्चेला उत्तर दिले
गोपीनाथ गड येथे आयोजित स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे यांनी आपण नेहमी काहीही बोललो तरी देखील त्याची मीडियामध्ये चर्चा होते आपल्या भूमिकेवरून आपण पक्षावर नाराज असल्याचे बोलले जाते मात्र मी जे बोलते ते माझं वैयक्तिक मत असतं पक्ष म्हणून मी कोणतीही भूमिका घेत नाही मला जे वाटते ते मी बोलते 2019 ला पराभव झाल्यानंतर आपण गोपीनाथ मुंडे यांनी घेतलेला समाजसेवेचा वसा आणि वारसा कायम जपण्याचा प्रयत्न केला आहे मात्र गेल्या चार वर्षात पक्षाने अनेक पराभूत झालेल्या लोकांना आमदार खासदार करून पुन्हा सत्तेत बसवले आपले मात्र नेमके कुठे चुकले हे अद्यापही सांगितले गेलेले नाही आता थेट अमित शहा यांची भेट घेऊन हा विषय क्लियर करणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले
राज्याच्या राजकारणात आपलं नेतृत्व करू शकेल असं कोणीही नाही त्यामुळे थेट अमित शहा हेच आपले नेते आहेत आणि त्यांनाच आपण भेटून थेट बोलणार आहोत असं सांगत पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा आपल्या मनातील नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली आहे
गेल्या काही दिवसापासून पंकजा मुंडे या पक्षावर नाराज असल्याचे मीडिया मधून बोलले जात होते त्या काहीतरी वेगळा निर्णय घेणार का याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले होते स्वर्गीय मुंडे यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात पंकजा आपली भूमिका स्पष्ट करतील असं बोललं जात होतं त्याप्रमाणे त्यांनी आज आपण नाराज नाहीत मात्र आपली दखल का घेतली जात नाही हा प्रश्न जनतेसमोर विचारला त्यावेळी जनतेतून गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने पक्ष उभा करा आणि मैदानात उतरा आम्ही आपल्या सोबत आहोत असे अनेकांनी त्यांना सांगितले आता पंकजा मुंडे या अमित शहा यांची भेट घेऊन आपल्या मनातील खदखद कधी व्यक्त करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
Leave a Reply