बीड -बीडचे आमदार संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या या भव्यदिव्य शिवजयंती चा आदर्श महाराष्ट्राने घ्यावा असे सांगत राज्य सरकारने लवकरात लवकर अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारावे असे आवाहन मराठा आरक्षण चळवळीचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी केले.
बीड येथील छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलावर हजारो शिवप्रेमीच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली. मनोज जरांगे पाटील, आ संदीप क्षीरसागर, शिवजयंती चे अध्यक्ष प्रा सत्येंद्र पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत उदघाटन पार पडले.
दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती, बीड शहर यांच्या माध्यमातून, आ.संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली डीजेमुक्त आणि वर्गणीमुक्त सांस्कृतिक शिवजयंती सोहळा पार पडला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून बीडकरांना विविध कला-क्रीडा सादरीकरणाच्या माध्यमातून अनोखी मेजवानी मिळाली.

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती, बीड शहक्ष यांच्या आयोजनातून बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर बुधवारी (दि.१९) रोजी शिवजन्मोत्सव सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी लाखो शिवप्रेमींनी या कार्यक्रमाचा मनमुक्त आनंद घेतला. आ.संदीप क्षीरसागरांनीही ढोल-ताशांच्या आणि शिवगीतांवर ठेका धरला होता. हे पाहून तरुणाई भारावली होती. या कार्यक्रमास बीड शहरासह ग्रामीण भागातील सर्व क्षेत्रातील मान्यवर, लाखो शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.
संदीपभैय्यांना मानावेच लागेल- मनोज जरांगे पाटील
अशा प्रकारची शिवजयंती मी पहिल्यांदाच पाहतोय. अशा प्रकारचे कौतुकास्पद नियोजन आणि आयोजन आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेले आहे. महिला भगिनींनाही शिवजयंती उत्सवात सहभागी होता येईल याची काळजी शिवजयंती उत्सव समितीकडून घेतली जाते. ही विशेष बाब आहे. यासाठी तर संदीपभैय्यांना मानावेच लागते. अशा शब्दांत संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांनी आ.संदीप क्षीरसागर व शिवजयंती उत्सव समितीचे कौतुक केले.
असे होते सांस्कृतिक कार्यक्रम
- करवीर नाद ढोल पथकाच्या तब्बल ४५० कलाकारांचे सादरीकरण
- तिबेटीयन मॉंक यांचे शाओलीन मार्शल आर्ट या चित्तथरारक साहसी खेळाच्या सादरीकरणाने प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवला.
-पश्चिम बंगाल येथील ‘रायबिशी आर्ट स्कूल’ नावाच्या पथक ऍक्रोबाईक्स फाईट आणि वेगवेगळे चित्त थरारक प्रात्यक्षिके सादर केली.
-ओडिशा राज्यातील ‘दुलदुली बाजा’ नावाचे आदिवासी वाद्य पथकाने आपली लोकनृत्य सादर केले.
-आंतरराष्ट्रीय दर्जाच्या लाईट आणि लेजर शो-ने प्रेक्षकांचे लक्ष वेधले.
Leave a Reply