केज – मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख कुटुंबाला न्याय देण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पदर पसरणार आहोत असं सांगत या प्रकरणी मी आणि बजरंग सोनवणे यांनी आठ दिवसापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची देखील भेट घेतल्याची माहिती राष्ट्रवादी कॉग्रेस च्या खा सुप्रिया सुळे यांनी दिली.
केज तालुक्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर सुळे यांनी तपासबाबत संताप व्यक्त केला. अद्यापही कृष्णा आंधळे फरार आहे हे यंत्रणाचे अपयश आहे असे त्यांनी म्हटले. तसेच दिल्लीत 8 दिवसांपूर्वी आपण खासदारांसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटलो असल्याचे सांगितले. सुप्रिया सुळे यांनी शाह यांच्यासोबतच्या भेटीचे कारणही सांगितले आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मस्साजोग गावचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची आज भेट घेतली. सुप्रिया सुळे यांनी देशमुख कुटुंबाचे सात्वंन केले. या भेटीनंतर सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले.सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 2 महिने उलटून गेले आहेत. हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आणि त्याच्या काही सहकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. तर, कृष्णा आंधळे हा आरोपी अजूनही फरार आहे.
सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, महाराष्ट्रात माणुसकी विसरली आहे का असा प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. माझ्या मुख्यमंत्र्याचे मतभेद असले तरी देवेंद्रजी कडून माझ्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत. मुख्यमंत्र्याच्या भेटीनंतर आठ दिवसात न्याय मिळेल अशी माझी ही अपेक्षा होती. या राज्यात असे कुठलेही कृती सहन केली जाणार नाही असा सिग्नल वरिष्ठ पातळीवरून द्यायला पाहिजे होता. हे राज्य छत्रपती शाहू फुले आंबेडकरांच्या संस्काराने चालेल असी परिस्थिती निर्माण व्हायला पाहिजे. मी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पदर पुढे पसरणार आहे आणि देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी करणार असल्याचेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले.
अमित शाहांची भेट का घेतली?
सुप्रिया सुळे यांनी या पत्रकार परिषदेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली असल्याचे सांगितले. आठ दिवसांपूर्वी 13 फेब्रुवारी आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. संतोष देशमुख प्रकरणात न्याय मिळावा यासाठी आम्ही भेटलो असल्याचे सुळे यांनी सांगितले. न्याय मागण्यासाठी आम्ही परत भेटू असेही त्यांनी सांगितले. गुन्हेगारांना फाशी झाली पाहिजे अशी बजरंग बाप्पानी संसदेत मागणी केली असल्याचेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
Leave a Reply