News & View

ताज्या घडामोडी

बँक,पतसंस्था, पोलीस अन खाजगी सावकारांना गंडा घालून व्यापारी फरार!

बीड – बीड शहरातील वेगवेगळ्या बँका आणि पतसंस्थांमध्ये व्हॅल्यू वर म्हणून काम करणाऱ्या एका सराफा व्यापाऱ्याने मोठमोठ्या बँका पतसंस्था काही पोलीस कर्मचारी आणि रोजंदारी करणारे खाजगी सावकार यांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घालून बीड सोडल्याची चर्चा सुरू झाल्याने एकच खळबळ माजली आहे स्वतःचे विलास गोल्ड या नावाने दुकान थाटून ज्या व्यापाऱ्याने खोटे सोने बँकांमध्ये गहाण ठेवून अनेकांच्या नावावर लाखो करोडो कर्ज उचलून उभारा केल्याची माहिती मिळाली आहे

बीड शहरातील सुभाष रोड भागामध्ये विलास गोल्ड नावाने सोन्या चांदीचे दुकान आहे या दुकानाचा मालक असलेला विलास उदावंत हा गेल्या आठ ते दहा दिवसांपासून बीड मधून गायब आहे दुकान देखील बंद आहे त्यामुळे मार्केटमध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

या विलास ने गेल्या चार-पाच वर्षात बीड शहरामध्ये सोन्या चांदीच्या व्यवसायामध्ये मोठे नाव कमावले बडोदा,विजया,जालना मर्चंट,प्रायव्हेट फायनान्स बीड अर्बन यासारख्या अनेक वित्तीय संस्थांच्या पॅनलवर व्हॅल्यू युवर म्हणून तो काम पाहत होता

या सर्व बँका आणि पतसंस्थांमध्ये सोने घडविणाऱ्या गोरगरीब कामगारांच्या नावावर त्याने गोल्ड लोन काढले यासाठी जे सोने तारण म्हणून ठेवण्यात आले त्यामध्ये 30 टक्के सोने आणि 70 टक्के तांबे आणि पितळ असल्याची चर्चा सुरू झाली आहे ज्या कामगारांच्या नावावर गोल्ड लोन घेतले आहे त्यांना दोन वेळ पोटभर खायची भ्रांत असताना बँका आणि पतसंस्थांनी विलासच्या भरोशावर हा सगळा व्यवहार केल्याची चर्चा सुरू झाली आहे.

विलास उदावंत याने सोन्याची बिस्किटे तारण म्हणून ठेवत लाखो कोट्यावधी रुपये कर्ज काढून वेगवेगळ्या बँका पतसंस्था तसेच काही व्यापाऱ्यांना देखील कोट्यावधी रुपयांना फसवण्याची चर्चा आहे अनेक व्यापाऱ्यांनी त्याच्याकडून सोन्याची बिस्किटे कमी भावात मिळत असल्यामुळे खरेदी केल्याची चर्चा आहे

बीड शहरातील स्थानिक गुन्हे शाखा असो की इतर पोलीस स्टेशनचे कर्मचारी अनेक जण विलास उदावंत यांच्या दुकानावर ता संत बसताना अनेकांनी पाहिले आहेत त्यामुळे या पोलीस कर्मचाऱ्यांची देखील त्याच्याकडे सोन्यात गुंतवणूक असल्याचे चर्चा आहे.

बीड शहरातील अनेक छोटे मोठे व्यावसायिक व्यापारी यांना रोजाने पैसे देणारे जे सावकार आहेत ते या उदावंत सोबत अनेक व्यवहारात असल्याची देखील चर्चा आहे या खाजगी सावकारांनी उदावंत कडे लाखो रुपये गुंतवणूक केल्याची चर्चा आहे गोरगरीब हातावर पोट भरणाऱ्या व्यापाऱ्यांकडून रोजाने पैसे कमवायचे आणि उदावंत कडे नेऊन सोन्यात गुंतवणूक करायची असा प्रकार सुरू होता अशी चर्चा आहे.

हा सगळा प्रकार अर्धा दिवसापासून व्यापारी तसेच पोलीस खाजगी सावकार आणि फसवणूक झालेले कामगार तसेच बँकांना माहित आहे मात्र अद्याप पर्यंत कोणीही तक्रार देण्यासाठी पुढे आलेले नाही हे विशेष.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *