केज -संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोक्का लावण्यात आलेल्या सहा आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यामध्ये सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, प्रतीक घुले, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनवणे यांचा समावेश आहे.तर वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे च्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबली आहे.
मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आल्यानंतर वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आज वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर केज जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. वाल्मिक कराडच्या खंडणी प्रकरणातील जामीन अर्जावर येत्या 20 तारखेला केज जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. वाल्मिक कराडच्या वकिलांनी न्यायालयाकडे 22 तारखेला पुढील सुनावणी व्हावी अशी मागणी केली होती. मात्र, न्यायालयानं सुनावणीसाठी 20 तारीख दिली आहे.
वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्यामध्ये केज जिल्हा सत्र न्यायालयाने न्यायालयाने कोठडी सुनावल्यानंतर कराडच्या वकिलाने कोर्टामध्ये लगेच जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. या अर्जाला सीआयडीकडून कोर्टामध्ये आव्हान देण्यात आले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मकोका लागलेल्या करडची सीआयडीला चौकशी करायची आहे. म्हणून वाल्मिक कराडला जामीन देऊ नये, अशी विनंती सीआयडीने कोर्टाकडे केली होती. याच जामीन अर्जावर आज केजच्या जिल्हा व सत्र न्यायालयासमोर सुनावणी झाली आहे. या सुनावणीत न्यायालयाने 20 तारखेला पुढील सुनावणी घेणार असल्याचे सांगितले आहे.
सहा आरोपीना न्यायालयीन कोठडी!
सहाही आरोपींना आता न्यायालयीन कोठडी मंजूर झाली असली तरी त्यांना वेगवेगळ्या तुरुंगात ठेवण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या सुधीर सांगळे व सुदर्शन घुले, सिद्धार्थ सोनवणे हे आरोपी माजलगाव येथील पोलीस कोठडीत आहेत, तर जयराम साठे, प्रतीक घुले व महेश केदार गेवराई पोलीस ठाण्याच्या कोठडीत आहेत.
९ डिसेंबर रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यानंतर राज्यात या घटनेचे पडसाद बघायला मिळाले होते. विरोधकांसह सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनीही या प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करून त्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली होती. या घटनेचा निषेध म्हणून राज्यातील विविध ठिकाणी मोर्चेही काढण्यात आले होते.
Leave a Reply