News & View

ताज्या घडामोडी

आजचे राशीभविष्य!

. ‼️दैनिक राशी मंथन‼️
. ‼️दिनांक ०८ जानेवारी २०२५‼️


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४६
🌞 संवत्सर : क्रोधीनाम
🌕 ॠतु…. शिशीर
🚩 उत्तरायण 🌕 पौष शुक्ल नवमी
🌸 नक्षञ… अश्विनी
🌸 वार… बुधवार
🌼 दिनांक….. ०८ जानेवारी २०२५
🌚 राहुकाल… दुपारी १२/०० ते ०१/३०
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०७/०५ मि.
🌘 सुर्यास्त ०५/५० मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩

मेष:- अत्यंत अनुकूल दिवस आहे. चंद्राचा शुक्र आणि शनीशी शुभ योग आहे. तुमची कीर्ती दिगंत पसरेल. यश मिळेल. सन्मान होईल.

वृषभ:- व्यय स्थानी चंद्र आहे. तरीही काही सुखद घटना घडतील. स्वतःसाठी खर्च कराल. घरगुती कामासाठी भ्रमंती घडेल.

मिथुन:- अत्यंत उत्तम दिवस आहे. स्वप्ने साकार होतील. शब्दास मान मिळेल. कर्जे मंजूर होतील. भौतिक सुखे प्राप्त होतील.

कर्क:- उद्योग/व्यवसायात भर घोसवाढ होईल. प्रगतीची नवी दालने खुली होतील. मनासारख्या घटना घडतील.

सिंह:- भाग्यातील चंद्र भाग्योदय घडवून आणेल. ज्येष्ठांचे आशीर्वाद मिळतील. नवीन खरेदी होईल. आयुष्याला नवीन अर्थ प्राप्त होईल.

कन्या:- अष्टम स्थानी चंद्र आहे. मात्र काही चांगले अनुभव येतील. सरकारी कामात प्रगती होईल.

तुळ:- धैर्यवान आणि बलवान बनाल. आरोग्य सुधारेल. सन्मान मिळतील. पत्नीचा सल्ला मानने हिताचे आहे.

वृश्चिक:- आर्थिक बाबतीत आज भाग्य उजळेल. प्रशासकीय कामे पूर्ण होतील. नवीन संधी मिळतील. व्यवसाय वाढेल. प्रवास घडतील.

धनु:- अनुकूल दिवस आहे. काही गणिते नव्याने जुळतील. व्यावसायिक संधी चालून येतील. चंद्राचा शुभ त्रिकोण योग सर्वकाही ठीक करेन.

मकर:- बऱ्याच दिवसांनी तुम्हाला शांतता लाभेल. सरकारी पदे मिळतील. आरोग्याचे प्रश्न अजूनही आहेतच. त्याकडे दुर्लक्ष नको.

कुंभ:- आर्थिक उलाढाल वाढेल. नवीन संधी प्राप्त होतील. दागिने, तयार कपडे विक्री करणाऱ्यांना उत्तम यश मिळेल.

मीन:- अनुकूल दिवस आहे. विविध प्रश्नमार्गी लागतील. अडचणी दूर होतील. नात्यातून लाभ होतील. प्रवास घडतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *