बीड -बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या विरोधात सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करणारे बीडचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे यांची तडकाफडकी पुणे कंट्रोल रूम ला बदली करण्यात आली आहे.
गणेश मुंडे यांनी पोलीस पत्रकार ग्रुपवर बीडचे खा सोनवणे यांच्या बद्दल बीडच्या खासदाराची चड्डी निघेल, मी जर प्रेस घेतली तर अशी वादग्रस्त पोस्ट केली होती. याबाबत खा सोनवणे यांनी कारवाईची मागणी केली होती.
याबाबत बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर गणेश मुंडे यांची पुणे कंट्रोल रूमला बदली करण्यात आली आहे.
Leave a Reply