केज -मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे यांना केज न्यायालयाने चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. बीड पोलिसांनी घुले अन सांगळे ला पुण्यातून ताब्यात घेतले होते.
या प्रकरणातील फरार असलेल्या तीन आरोपींना मदत करणाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर शनिवारी सकाळीच एसआयटीने सुदर्शन घुले, सुधीर सांगळ या गेल्या अनेक दिवसापासून फरार असलेल्या दोघाला ताब्यात घेतले. त्यांनतर सरपंच संतोष देशमुख यांचे लोकेशन आरोपींना देणाऱ्या मस्साजोग गावातील सिद्धार्थ सोनवणेला देखील शनिवारी सकाळी कल्याणमधून पोलिसांनी उचलले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. यापूर्वीच जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले यांना अटक केली आहे. सध्या प्रकरणात कृष्णा आंधळे हा फरार आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे लोकेशन आरोपींना देणाऱ्या मस्साजोग गावातील सिद्धार्थ सोनवणेला पोलिसांनी उचलले. सोनवणेला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा कल्याण (मुंबई) येथून एका उसाच्या गाडीवर काम करत असताना मुसक्या आवळल्या.
संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर सिद्धार्थ हा काही दिवस गावातच होता. मयत देशमुख यांच्या अंत्यविधीला देखील तो उपस्थित होता. स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पोलीस सुरुवातीला आरोपींचा तपास करत असताना त्यांनी आपले लक्ष गावातच केंद्रित केलेले होते. अपहरण करण्यापूर्वी कोणीतरी जवळचा व्यक्ती लोकेशन देत असावा असा संशय पोलिसांना होता. त्यामुळे त्याचा शोध पोलीस यंत्रणेकडून घेण्यात येत होता. लोकेशन देणाऱ्यांचा पोलीस शोध घेत असल्याची कुणकूण सिद्धार्थला लागताच तो गावातून फरार झाला होता.
घुले,सांगळे यांना पोलिसांनी सुरवातीला नेकनूर पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर केज पोलीस ठाण्यात नेवून तेथून केज न्यायालयात हजर केले. त्या ठिकाणी या सर्व आरोपीना चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
Leave a Reply