. ‼️दैनिक राशी मंथन‼️
. ‼️दिनांक २७ डिसेंबर २०२४‼️
सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४६
🌞 संवत्सर : क्रोधीनाम
🌕 ॠतु…. शिशीर
🚩 उत्तरायण 🌕 मार्गशिर्ष कृष्ण द्वादशी
🌸 नक्षञ… विशाखा
🌸 वार… शुक्रवार
🌼 दिनांक….. २७ डिसेंबर २०२४
🌚 राहुकाल… सकाळी १०/३० ते १२/००
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०७/०५ मि.
🌘 सुर्यास्त ०५/४५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩
मेष राशी .
छोट्या मोठ्या गोष्टींचा मनावर परिणाम होऊ देऊ नका. आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. मित्र आणि अनोळखी यांच्यातील फरक ओळखण्याची सावधनता बाळगा. अचानक नवीन काम करण्याची संधी मिळाल्याने तुम्ही उत्फुल्लीत व्हाल. तुमच्या अवतीभवती काय घडतेय याकडे लक्ष द्या – आज तुम्ही केलेल्या कामाचे श्रेय दुसरेच कुणीतरी घेण्याची शक्यता आहे. प्रलंबित अडचणी प्रश्न लवकरात लवकर सोडविणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्हाला कोठेना कोठे तरी सुरुवात कराविच लागेल. म्हणून सकारात्मक विचाराने आजच त्या दिशेने प्रयत्न सुरू करा.
वृषभ राशी .
अध्यात्मिक आणि भौतिक लाभासाठी ध्यानधारणा आणि योगाचा वापर करू शकता. तुम्ही प्रवास करणे आणि पैसे खर्च करण्याच्या मूडमध्ये असाल – परंतु नंतर त्याचे तुम्हाला दु:ख होईल. तुमच्या बेफिकीर वृत्तीमुळे पालक काळजीत पडतील. नवीन प्रकल्पात हात घालण्याअगोदर तुम्हाला त्यांना विश्वासात घेण्याची गरज आहे. त्रयस्थ व्यक्तीचा हस्तक्षेप तुम्ही आणि तुमच्या प्रिय व्यक्तीमध्ये संघर्ष निर्माण करू शकतो. आपल्या जोडीदाराने दिलेले वचन पाळले नाही म्हणून त्यावर उखडू नका. शांतपणे एकत्र बसून विचार करून गुंता सोडविणे गरजेचे आहे. आज आपल्या विवेक वापर करून कुटुंबियातील सदस्यांसोबत बोला जर तुम्ही असे नाही केले तर, व्यर्थ भांडणांवर तुमचा वेळ खर्च होऊ शकतो. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्या दैनंदिन गरजा भागविणे थांबवेल, त्यामुळे दिवसभर निराश असाल.
मिथुन राशी .
तुमच्या चपळ कृतीमुळे तुम्हाला उत्तेजन मिळेल. यश मिळविण्यासाठी वेळकाळ पाहून तुमच्या संकल्पनांमध्ये बदल करा. त्यामुळे तुमचा दृष्टिकोन विस्तारेल – तुमचे क्षितीज व्यापक बनेल – तुमचे व्यक्तिमत्व वृद्धिंगत होईल आणि तुमचे मन सुखावेल. आज तुम्ही त्या लोकांना उधार देऊ नका ज्यांनी तुमची मागील उधारी चुकवलेली नाही. कुटुंबातील सदस्यांना मदत करणे आणि तुमचे छंद जोपासणे यासाठी वेळ खर्च कराल. आपले विचार जगजाहीर होऊ देऊ नका. कामातील आपल्या चुका कबूल करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. पण स्वत:ला कसे सुधारता येईल याची कारणमीमांसा करणे गरजेचे आहे. एखाद्याला दुखावले असेल तर त्याची माफी मागा. प्रत्येकजण चुका करतो, पण मूर्ख व्यक्ती चुकांची पुनरावृत्ती करतात हे लक्षात ठेवा. नव्या कल्पनांची परिक्षा घेण्यासाठी योग्य दिवस आहे. जर तुमच्या आयुष्याला नियंत्रित करण्यासाठी तुम्ही इतरांना तुमच्या जोडीदारापेक्षा अधिक संधी देत असाल तर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून विपरित प्रतिक्रिया मिळेल.
कर्क राशी .
परिस्थितीवर तुमचे नियंत्रण आले की तुमची चिंता नाहिशी होईल.साबणाच्या फुग्याला स्पर्श करताच तो जसा फुटून जातो तसेच हे असल्याचे तुमच्या लक्षात येईल काही जणांसाठी प्रवास केल्याने थकून जाल आणि तणाव वाढला तरी आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहाल. मुलांनी अपेक्षापूर्ती न केल्यामुळे तुम्हाला निराशा येईल. तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी तुम्ही मुलांना प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. प्रियजनांसमवेत छोट्या सुट्टीची मजा लुटायला निघालेल्यांसाठी ही सुट्टी संस्मरणीय ठरेल. तुमचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शांतपणे काम करा आणि तुम्ही त्यात यशस्वी होईपर्यंत तुमच्या हेतूबद्दल कुणाला काही सांगू नका. खरेदीमध्ये उधळेपणा टाळा. आज तुमच्या जोडीदाराकडून तुमच्याकडे आज विशेष लक्ष देण्यात येणार आहे, असे दिसते.
सिंह राशी .
तुमचे आवडते छंद जोपासण्यासाठी किंवा तुमच्या आवडीच्या गोष्टींचा आनंद लुटण्यासाठी तुम्ही वेळ खर्च करायला हवा. जर प्रवास करत असाल तर आपल्या महत्वाच्या वस्तूंची काळजी घ्या. जर तुम्ही दुर्लक्ष केले तर सामान चोरी होण्याची शक्यता आहे. जे आपली परिस्थिती समजू शकतात आणि गरज ओळखू शकतात अशा जवळच्या मित्राबरोबर बाहेर फिरायला जा. तुम्ही अनोळखी व्यक्तींमध्ये लोकप्रिय व्हाल आणि त्यांना सहजपणे आकर्षित करून घ्याल. आज तुमचे मन ऑफिसच्या कामामध्ये लागणार नाही. आज तुमच्या मनात काही दुविधा येतील जे तुम्हाला एकाग्र होऊ देणार नाही. दिवसाची सुरवात जरी थोडी थकणारी राहील परंतु, जसे जसे दिवस पुढे जातील तुम्हाला चांगले फळ मिळायला लागतील. दिवसाच्या शेवटी तुम्हाला आपल्यासाठी वेळ मिळू शकेल आणि तुम्ही कुणी जवळच्या सोबत भेट करून या वेळेचा सदुपयोग करू शकतात. काहींच्या मते लग्न म्हणजे मौजमस्ती आजा मात्र सगळं शांत आणि प्रसन्न असेल.
कन्या राशी .
त्रस्त आणि व्यस्त असे कामाचे वेळापत्रक तुम्हाला शीघ्रकोपी बनवेल. अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील. दूरवर राहणा-या नातेवाईकांकडून अनपेक्षितपणे गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा दिवस ठरेल. वेळ, काम, पैसा, मित्र, कुटुंबीय, नातेवाईक हे सगळे एका बाजूला आणि तुम्ही व तुमचा जोडीदार दुसऱ्या बाजूला, एकमेकांत गुंफलेले. आपल्या कामावर सारे लक्ष केंद्रीत करा, भावनिक गुंत्याला चार हात दूर ठेवा. आज तुमची व्यस्त दिनचर्या असून ही स्वतःसाठी वेळ काढण्यात समर्थ असाल आणि या रिकाम्या वेळेत आपल्या कुटुंबातील व्यक्तींसोबत चर्चा आणि गप्पा करू शकतात. तुमच्या अवतीभवतीचे लोक तुमच्या नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण करण्याचे प्रयत्न करण्याची दाट शक्यता आहे. परक्या लोकांचा सल्ला मानू नका.
तुळ राशी .
तुमची संध्याकाळ काहीशा मिश्र भावनांमुळे तणावाची ठरू शकते. परंतु, चिंता करण्याचे कारण नाही – कारण निराशेपेक्षा आनंद-समाधान यामुळे तुम्ही खुशीत राहाल. जे लोक लघु उद्योग करतात त्यांना आजच्या दिवशी आपल्या कुठल्या ही जवळच्या लोकांचा सल्ला मिळू शकतो. ज्यामुळे आर्थिक लाभ ही मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांसमवेत वेळ घालवणे आनंदाचे निधान ठरेल. तुम्ही आयुष्यभर प्रेम केलेत तर तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी तुम्ही आज तुमच्या मनाला पटतील अशा पैसा कमाविण्याच्या नवीन संकल्पनांचा लाभ घ्या. कुठल्या ही स्थितीमध्ये तुम्हाला आपल्या वेळेची काळजी घेतली पाहिजे लक्षात ठेवा जर वेळेची कदर केली नाही तर, यामुळे नुकसान होईल. विवाहाचा परमोच्च आनंदाचा क्षण तुम्ही आज अनुभवू शकाल.
वृश्चिक राशी .
अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल. आज तुम्हाला कुणी अज्ञात स्रोताने पैसा प्राप्त होऊ शकतो ज्यामुळे तुमच्या बऱ्याच आर्थिक समस्या दूर होतील. आगाऊ ठरविलेली प्रवासाची योजना कुटुंबातील आजारपणामुळे पुढे ढकलावी लागेल. तुम्ही कठोर बोलण्यावर नियंत्रण ठेवा कारण त्यामुळे तुमच्या प्रिय व्यक्तींशी तुमचे संबंध दुरावू शकतील आणि शांतता भंग होईल. कामकाजाच्या ठिकाणी होणा-या बदलांमुळे तुम्हाला फायदा होईल. प्रवास-करमणूक आणि लोकांमध्ये मिसळणे हाच तुमच्या आजच्या दिवसाचा विषय आहे. तुमच्या जोडीदाराचा आज तुम्हाला मदत होईल.
धनु राशी .
अति उत्साह आणि भयकारी महत्त्वाकांक्षा तुम्हाला चिंतेत टाकू शकते. हे टाळण्यासाठी तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा. आज घरातून बाहेर जातांना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा यामुळे तुम्हाला धन लाभ होऊ शकतो. मित्रमंडळी मदतीसाठी तत्पर असतील आणि आपणास खरा आधार देतील. आपल्या जोडीदाराच्या अनुपस्थितीची उणीव भासण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना चांगला दिवस. अनपेक्षित फायदा अथवा घबाड मिळण्याची शक्यता आहे. उद्येग व्यसायानिमित्त केलेला प्रवास दीर्घकाळापर्यंत फायदेशीर ठरू शकेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत खूप छान काळ घालवाल.
मकर राशी .
तुमच्यात आज उत्तम स्पुर्ती पहिली जाईल. तुमचे स्वास्थ्य आज पूर्णतः तुमची साथ देतील. जर तुम्ही कुणाकडून आपली उधारी माघात असाल आणि तो काही कारणास्तव तुमच्या गोष्टीला टाळत असेल तर, आज तो न बोलता तुम्हाला पैसे परत करेल. कुटुंबाचे सगळे थकलेले कर्ज तुम्ही फेडू शकाल. नवीन कामांसाठी अत्यंत उत्तेजनापूर्ण दिवस आहे. सायंकाळसाठी काही तरी खास योजना आखा, आणि आजची सायंकाळ जास्तीतजास्त मजेशीर करण्याचा प्रयत्न करा. आज तुम्ही छोटी छोटी पण महत्त्वाची प्रलंबित कामे हातावेगळी करू शकाल. वेळेपेक्षा अधिक काहीच नाही म्हणून, तुम्ही वेळेचा सदुपयोग करतात परंतु, बऱ्याच वेळा तुम्हाला जीवनाला लवचिक बनवण्याची आवश्यकता ही असते आणि आपल्या घर कुटुंबासोबत वेळ घालवण्याची गरज असते. तुमच्या नेहमीच्या दिवसापेक्षा आजचा दिवस हा वैवाहिक आयुष्यातील वेगळा दिवस असेल, तुम्हाला आज काहीतरी वेगळा अनुभव मिळणार आहे.
कुंभ राशी .
संयम बाळगा, आपले निंरतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आपणास हमखास यशप्राप्ती होणार आहे. मागच्या दिवसात तुम्ही जितके धन आजचा काळ उत्तम बनवण्यासाठी गुंतवणूक केली होती त्याचा फायदा आज तुम्हाला मिळू शकतो. तुम्ही इतरांच्या चुका विनाकारण दाखविल्यामुळे नातेवाईक तुमच्यावर टीका करतील. अशा प्रकारे वेळ वाया दवडला जातो याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे. यातून तुम्हाला काहीच फायदा होत नाही. त्यापेक्षा तुमच्या सवयी बदला. तुमच्या जोडीदाराची प्रकृती बिघडल्याने आज तुम्हाला काही काम करता येणार नाही. करिअरविषयक संधी अधिक विस्तारण्यासाठी तुमची व्यावसायिक ताकद वापरा. तुम्ही असलेल्या क्षेत्रात तुम्हाला अमर्यादित फायदा मिळण्याची शक्यता आहे. वरचढ ठरण्यासाठी कौशल्य विकसित करण्यात स्वत:ला गुंतवून घ्या. अडचणी आल्या की चपळाईने काम करण्याची तुमची क्षमता तुम्हाला मान्यता मिळवून देईल. एका लहानशा बाबीवरून तुमच्या जोडीदाराने खोटेपणा केल्यामुळे तुम्ही नाराज असाल.
मीन राशी .
तुमची देण्याची वृत्ती म्हणजे अप्रत्यक्ष मदत करण्याची वृत्ती होय. त्यामुळे शंका, निरुत्साह, अश्रद्धा, मत्सर, हेवा, गर्व यापासून तुम्ही मुक्त व्हाल. महत्त्वाच्या व्यक्ती कधीही आर्थिक मदत द्यायला तयार असतील. तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील नव्या घडामोडीमुळे तुम्ही आणि तुमचा संपूर्ण कुटुंबाला आनंद होईल. तुम्ही प्रेमाच्या मूडमध्ये आहात – आणि त्यासाठी तुम्हाला भरपूर संधीही आज मिळणार आहेत. प्रलंबित कामामुळे प्रचंड व्यस्त व्हाल – त्यामुळे आराम करायला आज फुरसत मिळणार नाही. ज्या नात्याला तुम्ही महत्व देतात त्यांना वेळ देणे ही तुम्हाला शिकावे लागेल अथवा नाते तुटू शकतात. विवाहाचा परमानंद काय असतो, याची जाणीव आज तुम्हाला होईल.
Leave a Reply