बीड -शहरातील बार्शी नाका भागात असलेल्या प्रकाश आंबेडकर नगर मध्ये गोळीबार करून फरार झालेल्या तीन आरोपीना पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतले आहे.
बीड शहरातील प्रकाश आंबेडकर नगर भागात राहणाऱ्या विश्वास डोंगरे याच्या घरी जाऊन अक्षय आठवले, मनीष क्षीरसागर आणि इतरांनी बेधुंद गोळीबार केला होता. यांध्ये डोंगरे हे जखमी झाले होते.
या प्रकरणी पेठ बीड पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना झाले होते. पुण्यात यातील अक्षय आठवले, मनीष क्षीरसागर आणि तिसरा आरोपी असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी या आरोपीना पकडले.
Leave a Reply