बीड -मराठवाड्यात ज्या काही अटीटतीच्या किंवा चूरशीच्या म्हणून लढती होत्या त्यात बीड विधानसभा मतदार संघाची लढत होती. विद्यमान आ संदीप क्षीरसागर विरुद्ध बंधू डॉ योगेश क्षीरसागर अशा लढतीत वडील, भाऊ, काका, सगळे नातेवाईक, पालकमंत्री, सरकार विरोधात असतानाही संदीप क्षीरसागर यांनी मोठा विजय मिळवला. रक अकेला शेर बाकी सब ढेर अशा पद्धतीने आ संदीप क्षीरसागर यांचा विजय म्हणता येईल.
बीड विधानसभा मतदारसंघात सकाळी मतमोजणी सुरु झाल्यानंतर फुलसांगवी ते पन्नास बूथवर फोन योगेश क्षीरसागर यांना साडेतीन ते चार हजारची आघाडी होती. त्यानंतर बीड शहर सुरु झाले आणि पाचव्या फेरिंनंतर आ संदीप क्षीरसागर यांनी आघाडी घेण्यास सुरवात केली.
बीड शहरातील तब्बल 161 बूथवर आठ ते नऊ हजाराची आघाडी घेत संदीप क्षीरसागर यांनी ग्रामीण मध्ये प्रवेश केला. राजुरी, रायमोह या भागात आघाडी कायम ठेवत शेवटच्या फेरीपर्यंत संदीप यांची सात हजारची आघाडी कायम राहिली.
आ संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात काका जयदत्त क्षीरसागर, बंधू योगेश क्षीरसागर, हेमंत क्षीरसागर, रवींद्र क्षीरसागर यांच्यासह संपूर्ण परिवार एकत्र झाला होता. गाडीत बसायला माणूस नाही, त्याच्या मागे कोणी नाही, मतदार स्वीकारणार नाहीत अशा चर्चा केल्या गेल्या.
मात्र संदीप यांच्या सोबत शरद पवार यांची ताकद, कार्यकर्त्यांची फळी आणि मतदारांचे आशीर्वाद होते, त्यामुळे त्यांनी या सगळ्या दिग्गजाना पाणी पाजत पुन्हा एकदा विधानसभेचा गड सर केला.
Leave a Reply