गेवराई -महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांच्यासाठी कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून संपूर्ण पंडित कुटुंब प्रचारात उतरले आहे. अमरसिंह पंडित, जयसिंह पंडित, पृथ्वीराज पंडित, रणवीर पंडित, विजयसिंह पंडित, विजया पंडित यांच्यासोबत आता सुनबाई श्रावणी पंडित यांनी देखील प्रचारात उडी घेतली आहे. पंडितांच्या डोअर टू डोअर प्रचाराने विरोधक मात्र कोमात गेले आहेत.
गेवराई विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रचार रंगात आला असून महायुतीचे अधिकृत उमेदवार विजयसिंह पंडित यांच्या विजयासाठी संपूर्ण शिवछत्र परिवार प्रचारात उतरला आहे. माजी आमदार अमरसिंह पंडित, शिवशारदा मल्टीस्टेटचे अध्यक्ष जयसिंग पंडित. सौ विजेता विजयसिंह पंडित, पृथ्वीराज पंडित, रणवीर पंडित यांच्याबरोबरच आता विजयसिंह पंडित यांच्या सुनबाई सौ. श्रावणी पृथ्वीराज पंडित याही प्रचारात उतरल्या आहेत. त्यांनी गेवराई शहरातील सिंधी कॉलनी, साठे नगर, संघमित्रा नगर, वाघमारे वस्ती, शिक्षक कॉलनी, तय्यब नगर, विर लहुजी नगर आदी भागातून प्रचार फेरी काढत घरोघरी भेटी देऊन विजयसिंह पंडित यांना विजयी करण्याचे आवाहन केले. त्यांच्या प्रचार दौऱ्याला महिला मतदारांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, शिवछत्र परिवाराने कायम सामान्य माणसाचा विचार केला आहे. गेवराईच्या शहरासह ग्रामीण भागाच्या विकासासाठी शिवछत्र परिवार कायम कटिबद्ध आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्या भागाच्या मूलभूत सुविधा आणि विविध विकास कामे गतीने पूर्ण करण्यासाठी आपले लाडके नेते विजयसिंह पंडित यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी सौ. मुक्ता आर्दड, सौ योगिता तांबारे, सौ जयश्री दाभाडे, सौ सीमा जवंजाळ, सौ संगीता सागडे, सौ प्रणिता रुकर, सौ संध्या येवले, सौ अनिता काळे, सौ पल्लवी राठोड, सौ नंदा गायकवाड, सौ वंदना घोलप, सौ मिना पंडित, सौ दिपाली जाधव, इनामदार, सौ सुतार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply