बीड – विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातून राजाभाऊ फड यांनी माघार घेतली आहे तर दुसरीकडे बीड मतदार संघातून अपक्ष म्हणून अनिल जगताप लढणार आहेत, माजीमंत्री सुरेश नवले यांनी देखील माघार घेतली आहे. बीडमध्ये अनिल जगताप, ज्योती मेटे आणि कुंडलिक खांडे यांनी आपले अर्ज कायमच ठेवले आहेत.
राज्याच्या विधानसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यात मोठमोठ्या उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणूक चूरशीची होणार आहे.
बीडमधून माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर, सुरेश नवले, राजेंद्र मस्के, अशोक लोढा यांनी माघार घेतली आहे. अनिल जगताप, कुंडलिक खांडे आणि ज्योती मेटे यांनी उमेदवारी कायमच ठेवली आहे.
दुसरीकडे परळी विधानसभा मतदार संघतून अपक्ष उमेदवार राजाभाऊ फड यांनी माघार घेतली आहे, त्यामुळे येथे महाविकास आघाडीचे राजेसाहेब देशमुख आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यात थेट लढत होणार आहे.
अनिल जगताप यांच्यावर एकमत
बीड विधानसभा मतदार संघात बहुतांश मराठा उमेदवारांनी माघार घेताना शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
Leave a Reply