अंतरवली सरटी -विधानसभा निवडणुकीत मराठा, मुस्लिम, दलित असं कोंबिनेशन तयार करून सर्वाना धक्का देण्याची तयारी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी अचानक यु टर्न घेत निवडणुकीतून माघार घेण्याचे जाहीर केले आहे.
जरांगे पाटील हे 3 नोव्हेंबर रोजी कुठं उमेदवार उभे करायचे अन कुठं पाडायचे हे जाहीर करणार होते. त्यानुसार त्यांनी रविवारी बीड, केज, फुलंब्री, नांदगाव यशह 20 ते 25 मतदारसंघात लढण्याचे जाहीर केले. पहाटे सात वाजेपर्यंत नावे जाहीर करण्याचे ठरले.
मात्र सकाळी नऊ वाजता पत्रकार परिषदेत त्यांनी कुठेच निवणूक ना लढवता माघार घेण्याचे जाहीर केले. केवळ मराठा जातीवर निवडणुकीत यश मिळू शकत नाही, आमच्या दोन मित्र पक्षाने यादी दिली नाही, का दिली नाही, नेमकं काय घडलं यात आपण पडत नाही, मात्र निवडणूक लढणे आपले काम नाही अन पाडणे देखील नाही असं म्हणत जरांगे पाटील यांनी समाजाने हा निर्णय घ्यावा अन त्यांना जो योग्य वाटतो तो उमेदवार निवडून द्यावा असे म्हटले.
Leave a Reply