बीड- जिल्हा परिषदेच्या बदल्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र जोडणाऱ्या तब्बल 41 शिक्षकांना 31मे पर्यंत मुंबईच्या जे जे रुग्णालयात हजर राहून तपासणी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले आहेत.शिक्षकांनी हा अहवाल वेळेत न दिल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदलाच्या वेळी तब्बल 300 पेक्षा जास्त शिक्षकांनी दिव्यांग प्रमाणपत्र जोडून बदलीचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला होता.याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर सीईओ अजित पवार यांनी या प्रमानपत्रांची तपासणी करण्याचे आदेशदिले.त्यानुसार अंबाजोगाई रुग्णालयात तपासणी झालेल्या शंभर पेक्षा अधिक शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
या शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने त्यांना दिलासा दिला.या शिक्षकाकडून माफीनामे घेऊन कारवाई न करण्याचे आदेश दिले गेले.जे शिक्षक माफीनामे देणार नाहीत त्यांची जे जे रुग्णालयात तपासणी करण्यात यावी असेही न्यायालयाने म्हटले होते.
त्यानुसार ज्या ज्या शिक्षकांनी माफीनामे दिले त्यांच्यावरील कारवाई टळली मात्र तब्बल 41 शिक्षकांनी माफीनामे दिले नाहीत म्हणून आता त्यांची जे जे रुग्णालयात तपासणी करण्यात येणार आहे.
या शिक्षकांची होणार तपासणी …………………!वर्षा पोकळे,महादेव जाधव,मनोज जोशी,मनोज सूर्यवंशी,पांडुरंग गवते,शीतल नागरगोजे,स्वाती शिंदे,भारती गुजर,अंबिका बगाडे,विमल ढगे,जीवन बागलाने,शोभा काकडे,अश्रूबा भोसले,तब्बसुम वाजेदा,उज्वला जटाळ,आयशा इनामदार,बाळू सुरसे,गोविंद वायकर,महेश नरवडे,शीतल जावळे,जयराम मांगडे,प्रकाश भोसले,रामदास साबळे,साहेबराव पोकळे,रिजवान नूर,वैजीनाथ गडदे,बाळासाहेब शेंदूरकर,सुरेखा वाघमारे,दत्तात्रय गुरसाळे,मीना भागवत,शोभा राजगुरू,रोहिदास राठोड,बाबासाहेब तांदळे,गिरीश जोशी,बाळासाहेब दगडखैर,संगीता पालवे,सुनील वैरागे,महादेव कांजवणे,संगीता माळाले,विजय गर्जे,नवलिता जाधव
Leave a Reply