News & View

ताज्या घडामोडी

महाराष्ट्राचा रणसंग्राम सुरु!

नवी दिल्ली – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखाची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त अजितकुमार यांनी जाहिरात केली. राज्यातील 288 मतदारसंघात ही निवडणूक होणार आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत जाहिर केल्यानुसार नोव्हेंबर महिन्यात मतदान आणि निकाल जाहिर होईल.मतदान हे 20 नोव्हेंबर या तारखेला आणि मतमोजणी   23 नोव्हेंबर 2024 या तारखेला होईल.

नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरवात

22ऑक्टोबर

नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख

29 ऑक्टोबर

नामनिर्देशन पत्राची छाननी तारीख

30 ऑक्टोबर

नामनिर्देशन पत्र माघार घेण्याची अंतिम तारीख

4 नोव्हेंबर

मतदानाची तारीख -20 नोव्हेंबर

मतमोजणीची तारीख -23 नोव्हेंबर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध सत्ताधारी महायुती अशी लढत होणार हे जवळपास निश्चित आहे, मात्र यामध्ये बच्चू कडू, छत्रपती संभाजी महाराज आणि राजू शेट्टी यांची तिसरी आघाडी तसेच वंचित आघाडी यांची भूमिका देखील महत्वाची ठरणार आहे.

विद्यमान सत्ताधारी महायुती ने राबवलेल्या लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी या योजनाचा फायदा त्यांना होईल अशी शक्यता आहे. मात्र मराठा आरक्षणाचा विषय कोणाला लाभदायक ठरणार हे पाहणे देखील आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *