News & View

ताज्या घडामोडी

स्थलांतरित शाळांचे पेव फुटले!

बीडमधील शाळा बंद करण्याचे आदेश!

बीड -इतर जिल्ह्यातील जुन्या मंजुरी असलेल्या शाळा विकत घ्यायच्या अन त्या बीडमध्ये स्थलांतरित केल्याचे दाखवून बोगसगिरी करायची हा उद्योग बीडमध्ये जोरात सुरु आहे. मात्र बीडच्या शिक्षण विभागाने या शाळांच्या स्थलांतरण प्रक्रियेस चाप लावला आहे. बीडमध्ये भूम तालुक्यातून स्थलांतरित केलेल्या शाळेला अमान्य करत शाळा बंद करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी यांनी दिले आहेत. अशाच प्रकारे बीडमध्ये आठ ते दहा शाळा स्थलांतर झाल्या आहेत.

बीड जिल्ह्यात कधी काय होईल हर सांगता येत नाही. विशेषतः शिक्षण क्षेत्रात सगळाच अवमेल आहे. मराठवाडा असो कि विदर्भ अथवा पश्चिम महाराष्ट्र या भागातील मंजूर असलेल्या शाळा शोधायच्या. त्या विकत घ्यायच्या, घरी बसून सगळे कागदपत्रे जमा करायची किंवा बोगस तयार करायची अन शाळा स्थलांतर केल्याचा प्रस्ताव दाखल करायचा.

हा प्रस्ताव दाखल केला कि लगेच पदभरती सुरु करायची अन त्यासाठी लाखो रुपये गोळा करायचे हा धंदा काही लोकांनी सुरु केला आहे. बीडमध्ये अशप्रकारे किमान आठवण ते दहा शाळा आणण्यात आल्या आहेत. पैसे देखील गोळा केले गेले आहेत

भूम येथील आफरीन शिक्षण संस्थेची शाळा बीड येथे उर्दू माध्यमिक शाळा, नमरा कॉलनी या ठिकाणी सुरु केली गेली. यासाठीचा आठवी ते दहावीच्या वर्गाचा मूळ प्रस्ताव देखील शिक्षण विभागात सादर केला गेला.

मात्र शासनाने या शाळेस स्थलांतर करण्याचे आदेश 2016 मध्ये दिलेले असताना प्रत्यक्षात शाळा 2024 ला स्थलांतरित झाली आहे. विशेष म्हणजे या प्रस्तावत शिक्षण संचालक पुणे यांचे पत्र नाहीये. मूळ शाळेच्या नावात बदल केलेला असून शाळा यु डायस वर दिसत नाही.

सदरील शाळा ही 2003पासून 2009पर्यंत बंद होती.तसेच 2003 पासून 2024 पर्यंत शाळेला दिलेल्या संचमान्यता देखील उपलब्ध नाहीत. शाळेचे मूल्यांकन करण्याचे कक्ष अधिकारी प्रमोद कदम यांचे पत्र देखील बोगस जोडलेले आहे. संस्थेचे 1860 व 1950 चे प्रमाणपत्र देखील सादर केलेले नाही. त्याचप्रमाणे शाळेचे मूळ. अभिलेखे देखील सादर ना करता हा प्रस्ताव सादर केलेला आहे.

एकूणच काय तर ही उर्दू शाळा स्थलांतर करण्याची संपूर्ण प्रक्रिया बोगस असल्याचे उघडं झाले आहे त्यामुळे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांनी सदरील शाळा अनधिकृत असल्याचे सांगत शाळा बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

बीड शहरात अशाच पद्धतीने बोगसगिरी करत शाळा स्थलांतर केल्याचे अनेक प्रकार झाले आहेत. या लोकांनी यासाठी कोट्यावधी रुपये गोळा केले आहेत. लवकरच या सर्व शाळा देखील बोगस असल्याचे उघडं होऊन त्यावर देखील कारवाई होणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *