मुंबई -आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला स्वर्वच पक्ष लागले आहेत. ऑक्टोबर च्या पहिल्या आठवड्यात जागावाटप फायनल करावे लागेल, ज्याचा जेथे आमदार टी जागा त्याला या पद्धतीने वाटप होईल, इलेक्टिव्ह मेरिट पाहिले जाईल अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात यंदा खरी लढत होणार आहे. त्यामुळे आगामी काळात राज्याच्या राजकारणात बरीच उलथापालत होऊ शकते. दरम्यान, महायुतीचं जागावाटप कसं होईल? उमेदवारी देताना कोणते निकष असतील? यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सविस्तर माहिती दिली. एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
विधानसभेच्या निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. परंतु, तरीही जागा वाटपाची चाचपणी सुरू आहे. महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांना किती जागा मिळणार? इतर मित्र पक्षांच्या वाट्याला किती जागा येणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. लोकसभेला जागा वाटपादरम्यान उशीर झाल्याने त्याचा फटका निकालावर बसला. त्यामुळे विधानसभेला लवकरात लवकर जागा वाटप करण्याची शक्यता आहे. यावर अजित पवार म्हणाले, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात हे संपवावं लागेल, असा आमचा प्रयत्न आहे.
उमेदवारांबाबत ते म्हणाले, “विरोधक कोणते उमेदवार उभे करणार पाहावं लागेल. विधानसभेचे उमदेवार उभे करताना इलेक्टिव्ह मेरिट पाहावं लागतं. तिथली राजकीय परिस्थिती, तिथली थोडी समीकरणं पाहावी लागतात. मी नाव घेणार नाही, पण काहींना मागच्या निवडणुकीत लोकसभेचं तिकिट मिळालं असतं तर ते पराभूत झाले असते, पण तिकिट न मिळाल्याची सहानुभूती मिळून ते निवडून आले. लोकसभेला अपक्ष निवडून येणं येऱ्या गबाळ्याचं काम नाही.”
असा उमेदवार निवडायचा की त्याला मतदारांनीही पाठिंबा दिला पाहिजे. तसंच, इतर तिन्ही मित्र पक्षांचंही समर्थन असलं पाहिजे. कारण, या तिन्ही पक्षांचेही काही मतदार असतात ते या उमेदवाराला मतदान करणार असतात, असं अजित पवार म्हणाले.
“इलेक्टिव्ह मेरिट ठरवताना प्रत्येकजण आपआपला प्रयत्न करणार. किती जागा लढवणार याबाबत मी काहीही बोललो नाही. आम्ही तिन्ही पक्ष आणि घटकपक्ष बसून जागांचं वाटप करू. आम्हाला अनेक लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचा अनुभव आहे”, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं.
Leave a Reply