बीड – गेल्या चार पाच दशकापासून मराठवाडा सह इतर भागात आपल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाने नावलौकिक मिळवलेल्या संघप्रणित एका शिक्षण संस्थेला भ्रष्टाचाराची वाळवी लागली आहे. किमान पंचवीस लाख ते जास्तीत जास्त एक कोटी पर्यंत टेबल खालून घेऊन या संस्थेतील वाहकाची जबाबदारी असणाऱ्याने करोडोची माया जमवली आहे. विशेष म्हणजे याची तक्रार संघाकडे देखील करण्यात आल्याची माहिती आहे. संस्थेत झालेल्या या भ्रष्टाचाराची पाळेमुळे न्यूज अँड व्यूज लवकरच खणून काढणार आहे.
मराठवाड्यातील वाडी वस्ती तांड्यावर असलेल्या, शिक्षणापासून कोसो दूर असणाऱ्या समाजाला शिक्षणाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संघाने काही शिक्षण संस्थांचे बीज रोवले. याला राजाश्रय लाभला अन वटवृक्षात रूपांतर झाले. आजघडीला संस्थेचा विस्तार मराठवाडा आणि इतर भागात देखील झालेला आहे. हजारो विद्यार्थी घडविण्याचे काम येथून अव्याहतपणे सुरु आहे.
परंतु गेल्या काही वर्षेपासून संस्थेचा कारभार हाकणाऱ्यांनी विश्व्सतांच्या भूमिकेतून कारभार ना करता मालक असल्याप्रमाणे वागण्यास सुरवात केली आहे. आपल्यावर संस्था सांभाळण्याची जबाबदारी आहे याचा विसर या लोकांना पडला अन संस्थेला भ्रष्टाचाराचे चंद्र ग्रहण लागले.
गेल्या पंधरा वीस वर्षात संस्थेचा कारभार हाकणाऱ्यांनी कोणीही या पैसे मोजा अन नोकरीला लागा असा उद्योग सुरु केला. बर याबद्दल कोणाकडे तक्रार करावी तर चोर अन पोलीस दोघेही म्हणजे संस्थाचालक अन संस्थावाहक दोघेही यात सामील. त्यामुळे अनेकांनी प्रयत्न करूनही या चंद्र ग्रहणातून संस्थेची सुटका करू शकले नाहीत.
आपली बहीण, भाऊ, मेव्हणे, भाचे, जावई, नातेवाईक आणि सगेसोयरे यांच्यासाठी संस्था म्हणजे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी ठरली आहे. घरी बसून अनेकांना पगार दिला जातो अन पोसले जाते. चालक आणि वाहक आपले आहेत म्हणल्यावर कोण कशाला भितो. ज्यांची द्वितीय श्रेणित उत्तीर्ण होण्याची लायकी नाही अशांना जवळ घेत काही जणांनी शिक्षक भरले आहेत कि गुंड पाळले आहेत हे कळेनासे झाले आहे.
या संस्थेत शिक्षक किंवा शिक्षकेत्तर कर्मचारी म्हणून नोकरी मिळवायची असेल तर जुन्या वाहकाला किंवा विद्यमान प्रशासनाला किमान पंचवीस लाख ते जास्तीत जास्त एक कोटी रुपये मोजावे लागतात. संस्थेला जे ग्रहण लागले आहे ते काढण्यासाठी न्यूज अँड व्यूज ने पाठपुरावा सुरु केला आहे.
Leave a Reply