News & View

ताज्या घडामोडी

जिल्हा परिषदेने केलेली पदोन्नती बेकायदेशीर!


बीड – जिल्हा परिषदेने दोन दिवसापूर्वी पाच कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली मात्र यामध्ये शासनाचे कायदे आणि नियम धाब्यावर बसवण्यात आले आहेत. कोणत्याही कर्मचाऱ्याला पदोन्नती देण्यासाठी विभागीय परीक्षा देणे बंधनकारक आहे, बीडमध्ये मात्र या नियमाला हरताळ फसण्याचा उद्योग सिइओ संगीतादेवी पाटील यांनी केला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे बीड जिल्हा परिषदेच्या कारभारावर लक्ष नसल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

शासन सेवेत असणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्याला पदोन्नती द्यायची असल्यास त्याला विभागीय परीक्षा किंवा प्रिशिक्षण घेणे बंधनकारक आहे. याबाबत शासनाने 11 ऑगस्ट 2022 रोजी काढलेल्या जी आर नुसार या परीक्षेतून सूट हवी असल्यास संबंधित कर्मचाऱ्यांची सेवा किमान पंधरा वर्ष झालेली असावी किंवा त्याने वयाची पन्नास वर्ष पूर्ण केलेली असावीत.

बीड जिल्हा परिषदेने ज्या पाच कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली आहे त्यात कोणीही विभागीय परीक्षा किंवा प्रशिक्षण घेतलेले नाही. फक्त यातील एक कर्मचारी यांचे वय पन्नास पेक्षा अधिक आहे, मात्र उर्वरित चार जणांनी परीक्षा ना देताच त्यांना पदोन्नती देण्यात आलेली आहे.

केवळ लक्ष्मीदर्शनाच्या आधारावर हा सगळा प्रकार झाल्याची चर्चा सुरु आहे. विशेष बाब म्हणजे यात बांधकामं चे कार्यकारी अभियंता राजपूत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी काकडे यांनी संगीतादेवी पाटील यांची दिशाभूल केल्याची चर्चा आहे.

राज्याचे कृषिमंत्री असणारे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांच्या जिल्ह्यात अधिकारी राज सुरु आहे. जिल्ह्यावर कंट्रोल असणाऱ्या मुंडे यांना जिल्हा परिषदेत जो काही गैरप्रकार आणि भ्रष्ट कारभार सुरु आहे त्याची कल्पना नाही कि ते जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहेत असा प्रश्न यनिमित्ताने उपस्थित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *