बीड -जिल्हा परिषदेत कधी काय होईल, कोण काय करेल याचा नेम नाही, कारण इथं अधिकारी राज सुरु आहे. तब्बल दोन वर्षांपासून वादात अडकलेल्या पदोन्नती च प्रकरण प्रभारी असणाऱ्या सिइओ संगीतादेवी पाटील यांनी निकाल काढले, मात्र हे करताना सेवा पुस्तिका अधिनियम ला हरताळ फासण्यात आला आहे. कायद्यात तरतूद नसताना शंभर रुपयांच्या बॉण्डवर पाटील मॅडम यांनी बोगस कागदपत्र असणाऱ्या कर्मचाऱ्याला प्रमोशन दिले आहे. यामध्ये मोठा आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा आहे.पाटील मॅडम जर असेच बॉण्ड वर प्रमोशन देणार असतील तर उद्या त्यांच्या कक्षासमोर उभा राहणारा शिपाई देखील बॉण्ड लिहून देईल मग त्या स्वतःचा चार्ज त्याच्याकडे देऊन त्याला प्रमोशन देणार का असा प्रश्न उपस्थित केला जातं आहे.
बीड जिल्हा परिषदेचा प्रभारी म्हणून पदभार घेतल्यानंतर संगीतादेवी पाटील या अविनाश पाठक यांच्याप्रमाणे नियमाने काम करतील अशी अपेक्षा होती. मात्र मॅडम यांनी नियम धाब्यावर बसवून काम करण्यास सुरवात केली आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप काकडे यांच्या हातचे बाहुले झाल्याप्रमाणे त्या सध्या कारभार करत आहेत. काकडे यांनी फाईल आणायची अन मॅडम नि सही करायची असे सुरु आहे.
बीड जिल्हा परिषदेच्या बांधकामं विभागातील पाच कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याबाबत गेल्या दोन वर्षेपासून फाईल पेंडिंग होती. तत्कालीन सिइओ अजित पवार, अविनाश पाठक यांनी हे बेकायदेशीर काम करण्यास नकार दिला. मात्र त्यानंतर पदभार आलेल्या पाटील मॅडम यांनी जाणीवपूर्वक ही फाईल मागवून घेत कैलास सानप याच्यासह पाच कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली आहे.
वास्तविक पाहता सानप यांनी ज्या महाविद्यालयाचे कागदपत्र जोडले आहेत ते बोगस असल्याचे संबंधित विद्यापीठ आणि महाविद्यालय यांनी स्पष्ट केले आहे. तरीदेखील काकडे यांच्या सांगण्यावरून पुन्हा तपासणी करून हे प्रमाणपत्र बरोबर असल्याचा खोटा अहवाल मॅनेज करण्यात आला.
त्यानंतर काकडे, समाजकल्याण अधिकारी शिंदे, कॅफो केंद्रे यांनी डोळेझाकून या फाईलवर सह्या केल्या. वास्तविक या फाईलमध्ये खोटी आणि बोगस कागदपत्र आहेत हे काकडे आणि बांधकामं चे प्रभारी राजपूत यांना माहित होते, तरीदेखील फाईल पाटील मॅडम यांच्यासमोर ठेवण्यात आली. पाटील यांनी देखील लक्ष्मीदर्शन होताच फाईल क्लियर केली.
या सगळ्यामध्ये मजेशीर गोष्ट म्हणजे प्रमोशन देताना दिलेल्या ऑर्डर मध्ये म्हटले आहे कि, फेरतपासणी मध्ये कागदपत्रे अवैध आढळून आल्यास पदावनत करण्यात येईल. विशेष म्हणजे शंभर रुपयांचा बॉण्ड घेण्यात आला आहे. कायद्यात बॉण्ड घेऊन प्रमोशन देण्याची तरतूद नसताना हा सगळा प्रकार पाटील मॅडम यांनी केला आहे. यामध्ये सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात लक्ष्मीदर्शनाचा लाभ झाल्याची चर्चा आहे.
Leave a Reply