जालना- केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री खा रावसाहेब दानवे,माजीमंत्री अर्जुन खोतकर,माजीमंत्री राजेश टोपे यांचं होम टाऊन असलेल्या जालना नगर परिषद ला महापालिकेत रूपांतरित करण्याचा ठराव राज्य शासनाने पारित केला आहे.त्यामुळे आता राज्यात 29 महापालिका झाल्या आहेत.महापालिका झाल्याने जालनेकरांनी आनंदोत्सव साजरा केला आहे.
जालना आता राज्यातील 29 वी महापालिका घोषित करण्यात आली असून, सरकारने तसे आदेश काढले आहेत. याबाबत नगरविकास विभागाच्या उपसचिवांनी अधिसूचना जारी केली आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून जालना नगरपालिकेचे रुपांतर महानगरपालिकेत करण्यासंदर्भात राजकीय हालचाली सुरू होत्या. यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडून प्रस्ताव मागवण्यात आला होता. त्यामुळे हा निर्णय शासनाच्या विचाराधीन होता. यासाठी सूचना आणि हरकती देखील मागवण्यात आल्या होत्या. त्यानंतर अखेर सरकारने जालना नगरपालिकेचे रुपांतर आता महापालिकेत करण्याचे आदेश काढले आहे.
जालना शहराला मोठी राजकीय परंपरा राहिलेली आहे.स्व अंकुशराव टोपे असोत की अर्जुन खोतकर किंवा रावसाहेब दानवे यांच्यासारख्या नेत्यांमुळे जालण्याला नेहमीच सत्तेत मानाचे स्थान राहिलेले आहे.आता महापालिका झाल्याने जालना शहराचा विकास होण्यास मदत होणार हे नक्की.
Leave a Reply