बीड – पंचायत समिती निवडणुकीच्या कारणावरून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपवरून बळीराम गवते आणि बबन गवते या दोघा पितापुत्रसह चार आरोपीना न्यायालयाने शिक्षा सुनावली.
बेलरा येथील पांडुरंग गवते यांना पंचायत समिती सभापती निवडीच्या कारणावरून एल आय सी कार्यालयासमोर बेदम मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले. यामध्ये बबन गवते, बळीराम गवते, गोपाळ गवते आणि किसन गवते यांच्यासह इतरांनी बेदम मारहाण केली.
- बोगस शिक्षक भरती घोटाळ्यात भाजपच्या माजी खासदाराचा भाऊ!
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
- नागपूर घोटाळा प्रकरणी आष्टीच्या माजी गटशिक्षणाधिकारी यांना अटक!
- शिक्षक भरती घोटाळ्यात शिक्षण मंडळाच्या अध्यक्षाना अटक!
या प्रकरणात शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला. दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाले. यावेळी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर युक्तिवाद झाला. यावेळी आरोपी बबन गवते, बळीराम गवते यांच्यासह चार जणांना एक वर्ष सहा महिने कारावास आणि प्रत्येकी सात हजार रुपये दंड ठोठावण्यात आला.
सरकारी पक्षाच्या वतीने एड कल्पना देशमुख यांनी युक्तिवाद केला.
Leave a Reply