Bid- ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेचे प्रमुख सुरेश कुटे आणि सौ अर्चना कुटे यांना बीड पोलिसांनी चौकशीसाठी बिडला आणले आहे. पोलिसांनी अद्याप त्यांना अधिकृतपणे अटक दाखवली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
तिरूमला ग्रुप आणि द कुटे ग्रुप वर ऑक्टोबर 2023 मध्ये इन्कम टॅक्स विभागाने कारवाई केली. त्यानंतर अचानक सुरेश कुटे यांच्या ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेत गडबड सुरु झाली.
अचानक पतसंस्थेच्या अनेक शाखा बंद झाल्या, ठेवीदारामध्ये गोंधळ निर्माण झाला. गेल्या आठ महिन्यात सुरेश कुटे यांनी पैसे परत करण्यासाठी अनेकवेळा तारखा जाहीर केल्या, मात्र पैसे दिलेच नाहीत.
त्यामुळे गेल्या महिन्यात माजलगाव, बीड सह अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले. परंतु पोलीस त्यांना अटक करत नसल्याने पोलिसांच्या कारभारावर शंका उपस्थित केली जातं होती.
- शहरात 98 हजार तर ग्रामीण मध्ये एक लाख चाळीस हजार मतदान!
- पहिला निकाल परळीचा तर आष्टी सर्वात शेवटी!
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
- घाटनांदूर मध्ये राडा, जिल्हाधिकारी यांचे कठोर कारवाईचे आदेश!
दरम्यान शुक्रवारी पहाटे बीड पोलीस पुण्यातील हिंजवडि येथील कुटे यांच्या घरी जाऊन त्यांना ताब्यात घेतले. आता त्यांना चौकशीसाठी बीड येथे आणण्यात आले आहे.
Leave a Reply