News & View

ताज्या घडामोडी

लाचखोर सलगरकर च्या घरी सापडले घबाड!

माजलगाव- लाचखोर कार्यकारी अभियंता सलगरकर याच्या घराची आणि लॉकरची झडती एसीबीने घेतली,तेव्हा दीड कोटींपेक्षा अधिकचा ऐवज मिळून आला.एसीबीच्या कारवाईने खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी न्यायालयाकडे विनंती करून सील केलेल्या लॉकरची झडती घेतली असता या लॉकरमध्ये तब्बल 11 लाख 89 हजार रुपयांची रोख रक्कम तसेच दोन किलो 105 ग्रॅम वजनाचे सोने असा एकूण एक कोटी 61 लाख 89 हजार रुपयांचा ऐवज मिळून आला. यामध्ये सोन्याच्या 1114 ग्रॅम वजनाच्या 7 बिस्किटांचा समावेश आहे.

दरम्यान जिजाऊ प्रकरणात आरोपी न करण्यासाठी लाच प्रकरणात अटकेत असलेल्या निलंबित पो.नि.हरिभाऊ खाडेच्या घरातूनही एसीबीने यापूर्वी कोट्यवधीची माया जप्त केली होती. त्यानंतरची ही मोठी कारवाई ठरली आहे.


राजेश आनंदराव सलगरकर हा माजलगाव पाटबंधारे विभागाचा कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत होता. 22 मे रोजी त्यास 28 हजार रुपयांची लाच घेताना बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले होते. दरम्यान याप्रकरणी त्याच्याविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सलगरकर हा मूळचा मिरज (जि.सांगली) येथील रहिवासी आहे. त्याच्यावर ट्रॅप झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने अंबाजोगाई येथे त्याच्या घराची झडती घेतली होती. त्यावेळी मिरज येथील युनियन बँकेच्या लॉकरची चावी एसीबीच्या पथकाला मिळून आली होती.


दरम्यान सदरचे लॉकर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सील करण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने दि. 31 मे रोजी या लॉकरची एसीबीच्या अधिकार्‍यांनी झडती घेतली. यावेळी या लॉकरमध्ये तब्बल 1 कोटी 61 लाख 89 हजार रुपयांचा ऐवज मिळून आला. यामध्ये 11 लाख 89 हजारांची रक्कम तसेच दोन किलो 105 ग्रॅम वजनाचे सोने आढळून आले. ज्यामध्ये 1114 ग्रॅम वजनाची सात बिस्किटे आणि 991 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने याचा समावेश आहे. पाटबंधारे विभागात कार्यकारी अभियंता म्हणून काम करताना राजेश सलगरकर याने ही संपत्ती कुठून मिळवली? याचा आता एसीबीचे अधिकारी हिशोब लावणार आहेत.

एसीबीचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर अधीक्षक मुकुंद आघाव उपाधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुलाब बाचेवाड यांनी केली.पोलिस अंमलदार भरत गारदे, अमोल खरसाडे, चालक अंबादास पुरी यांनी बँक लॉकरची झडती घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *