News & View

ताज्या घडामोडी

गुन्हे दाखल होताच ठेवीदारांना कुटेनी दिले पैसे !

बीड- येथील ज्ञानराधा मल्टिस्टेट पतसंस्था ठेवीदारांचे पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्याने वैतागलेल्या ठेवीदारांनी माजलगाव पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले.हे गुन्हे दाखल होताच कुटे यांनी आठ ठेवीदारांना 14 लाख रुपये परत केले.या प्रकरणी पोलिसांची भूमिका मात्र संशयास्पद असल्याची चर्चा आहे.

ज्ञानराधा मल्टिस्टेट पतसंस्था ऑक्टोबर 2023 मध्ये बंद झाली.तेव्हापासून हजारो ठेवीदारांनी आपल्या ठेवी मिळाव्यात यासाठी चकरा मारल्या.मात्र सुरेश कुटे यांनी वेळोवेळी वेगवेगळी तारीख देत वेळकाढूपणा केला.

त्यामुळे वैतागलेल्या दोन ठेवीदारांनी माजलगाव पोलिसात न्यायालयामार्फत गुन्हे दाखल केले.हे गुन्हे दाखल होताच पॅनिक होऊ नका म्हणणाऱ्या सुरेश कुटे यांनी त्या दोन ठेवीदारांना त्यांचे पैसे परत केले.याचवेळी सहा ठेवीदार हे एसपी यांना भेटण्यास गेले होते.एसपिंच्या म्हणण्यावर त्यांनी गुन्हा दाखल केला नाही.त्यानंतर या सहा जणांना देखील कुटे यांनी त्यांचे पैसे परत केले.

असाच प्रकार काही महिन्यांपूर्वी गेवराई येथे झाला होता.न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार गुन्हा दाखल होताच त्या ठेवीदारांना कुटे यांनी घरी नेऊन पैसे दिले होते.

https://youtu.be/Uqi0aCExnic

या सर्व प्रकरणानंतर आता ठेवीदारांनी गुन्हे दाखल केल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत अशी भावना निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *