बीड- तब्बल एक कोटी रुपयांची लाच मागून पाच लाख रुपये मध्यस्थांमार्फत स्वीकारल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेले अन फरार असलेले लाचखोर पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे हा स्वतःहून एसीबी समोर हजर झाला आहे.पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
माँ जिजाऊ पतसंस्था प्रकरणात सहकार्य करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांनी एक कोटी रुपयांची लाच मागितली होती. तीस लाख रुपयांवर तडजोड झाली.त्यातील पाच लाख रुपये मध्यस्थ कुशल जैन (मौजकर) याच्या मार्फत स्वीकारली गेली.
याबाबत एसीबीने गुन्हा दाखल केल्यानंतर खाडे फरार होता.त्याच्या घराची झडती घेतली असता एक कोटी रुपये रोख, साडेपाच किलो चांदी,90 तोळे सोने,बारामती,इंदापूर,परळी,बीड येथील व्यापारी गाळे आणि फ्लॅट,सहन प्लॉट चे कागदपत्रे जप्त करण्यात आले होते.
- आजचे राशीभविष्य!
- घाटनांदूर मध्ये राडा, जिल्हाधिकारी यांचे कठोर कारवाईचे आदेश!
- आजचे राशीभविष्य!
- आ क्षीरसागर यांची बदनामी, बीडमध्ये गुन्हा दाखल!
- आजचे राशीभविष्य!
खाडे यांच्या शोधासाठी चार पोलीस पथके तैनात करण्यात आली होती. दरम्यान बुधवारी रात्री उशिरा खाडे हा स्वतःहून एसीबी स्वमोर हजर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Leave a Reply