बीड- लोकसभा निवडणूक जाहीर होण्या अगोदर विद्यमान खासदाराकडून एका प्रवक्त्याने तब्बल तेरा लाख रुपये ढापले असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.विशेष म्हणजे हे पैसे पत्रकारांना देण्यासाठी घेतले गेले होते,पण त्यात स्वतःचे उखळ प्रवक्ता महाशयांनी पांढरे केल्याची चर्चा आहे.
देशभरात दीड महिन्यापूर्वी लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली.भाजप 400 पार जाणार की नाहि यावर चर्चा सुरू झाल्या.देशात मोदी लाट असल्याच्या बातम्या येऊ लागल्या.
इलेक्ट्रॉनिक मीडिया असो की सोशल मीडिया अथवा प्रिंट मीडियावर फिर एक बार ,मोदी सरकार अशा जाहिराती झळकू लागल्या.
या सगळ्या धामधुमीत एका प्रवक्ता महाशयांनी आपला डाव साधला.गेल्या दहा वर्षात आपण काय केले अन काय नाही याबाबत जनजागृती करण्यासाठी जाहिराती द्याव्या लागतील,वृत्तपत्रांना लेख पाठवावे लागतील अस म्हणत दोन अडीच महिन्यापूर्वी खासदाराकडून जवळपास तेरा लाख रुपये घेतले.
- बोगस शिक्षक भरती घोटाळ्यात भाजपच्या माजी खासदाराचा भाऊ!
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
- नागपूर घोटाळा प्रकरणी आष्टीच्या माजी गटशिक्षणाधिकारी यांना अटक!
- शिक्षक भरती घोटाळ्यात शिक्षण मंडळाच्या अध्यक्षाना अटक!
बर हे पैसे घेतल्यावर ज्या कामासाठी घेतले त्यावर खर्चच झालें नाहीत. ही बाब खासदार अन काही पत्रकार यांच्या लक्षात आली,त्यानंतर या प्रवक्ता महाशयांना काही काळ दूर ठेवले,मात्र जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही म्हणतात,त्याप्रमाणे हे गृहस्थ पुन्हा कारभार करण्यासाठी सक्रिय झाले आहेत असे दिसत आहे.
Leave a Reply