नवी दिल्ली- भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात मोठा ट्विस्ट आला आहे.उपोषण करणाऱ्या खेळाडूंनी आपली पदके परत करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे दिल्ली पोलिसांनी रात्री उपोषण स्थळी येऊन दंगल घडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.
दिल्ली पोलिसांनी संघाचे अध्यक्ष आणि भाजप नेते ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाच्या प्रकरणी गुन्हा दाखल केला असतानाच धरणे आंदोलनास बसलेल्या कुस्तीपटूंच्या वतीने ही घोषणा करण्यात आली आहे. आंदोलक पैलवानांचे म्हणणे आहे की, जेव्हा पोलिसांनी अध्यक्षाला अटक करून तुरुंगात टाकले तेव्हाच त्यांचे आंदोलन संपेल.
विनेश फोगट म्हणाल्या की, आपले करिअर पणाला लागले आहे. यावेळी आंदोलनात सहभागी कुस्तीपटू बजरंग पुनिया म्हणाला, या प्रकरणात अटक होऊ शकते, आम्ही निघू, आमचे लक्ष्य फक्त ब्रिजभूषण शरण सिंह आहे.
आंदोलनात असलेल्या पैलवानांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. आम्ही अशा वागणुकीची अपेक्षा करत नाही. देशात महिलांना अशी वागणूक दिली जात असल्याची परिस्थिती आहे. असेच करायचे असेल तर पदक परत करू, असंही त्या म्हणाल्या.
काल आंदोलनाचा आजचा बारावा दिवस होता विविध राजकीय पक्ष खेळाडूंना पाठिंबा दर्शवले. आंदोलक महिला कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी देखील मोर्चा काढला. पण, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याने बजरंग पुनियाने संतप्त प्रतिक्रिया दिली. भारतीय ऑलिम्पिक समितीच्या प्रमुख पीटी उषा यांनीही आज आंदोलकांची भेट घेऊन बाजू समजून घेतली. त्यानंतर, मध्यरात्री उशिरा दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल याही आंदोलनस्थळी पोहोचल्या होत्या. त्यावेळी, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.
Leave a Reply