News & View

ताज्या घडामोडी

images 2024 04 10T214235.518

जालन्यात डॉ कल्याण काळे !

मुंबई- काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रातील जालना आणि धुळे मतदारसंघात आपले उमेदवार जाहीर केले आहेत. जालन्यात माजी आ कल्याण काळे यांना तर धुळे मधून शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

काँग्रेस पक्षाने आपली चौथी यादी जाहीर केली,ज्यामध्ये महाराष्ट्रातून धुळे आणि जालना येथील उमेदवारांची घोषणा केली आहे.छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील फुलंब्री येथील माजी आ डॉ कल्याण काळे यांना जालना लोकसभा मतदारसंघात तर शोभा बच्छाव यांना धुळे मतदारसंघात उमेदवारी जाहीर केली आहे.

गेल्या पाच वेळा जालन्यातून निवडून येणारे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या विरोधात उमेदवारी मिळालेले काळे त्यांना कितपत टक्कर देणार हे आगामी काळात स्पष्ट होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *