मुंबई- गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून संपूर्ण बीड जिल्हा वाशी यांचे लक्ष ज्या गोष्टीकडे लागले होते त्यावर पडदा पडला आहे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या विरोधात बजरंग सोनवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून लोकसभेसाठीचे उमेदवार असतील याबाबतची घोषणा शरद पवार गटाकडून करण्यात आली त्यामुळे आता पवार विरुद्ध मुंडे हा सामना बजरंग सोनवणे जिंकणार की पंकजा मुंडे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाने दुसऱ्या यादीत पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर केली मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून गेल्या पंधरा दिवसापासून कोणाला उमेदवारी दिली जाणार याबाबत सस्पेन्स होता शिवसंग्रामच्या प्रमुख ज्योती मेटे यांनी नोकरीचा राजीनामा देऊन लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतला होता त्या दृष्टीने त्यांनी चार ते पाच वेळा शरद पवार यांची भेटही घेतली होती त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानले जात होते दरम्यान गुरुवारी सायंकाळच्या सुमारास शरद पवार गटाने ज्योती मेटे यांच्या ऐवजी बजरंग सोनवणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे
- कासलेची फेकाफेकी उघड!निवडणूक विभागाकडून गुन्हा दाखल!
- पोलीस पाटलांची भरती सुरु!
- आजचे राशीभविष्य!
- बडतर्फ कासले विरुद्ध पोलिसात तक्रार!
- आजचे राशीभविष्य!
बजरंग सोनवणे यांनी 2019 ची निवडणूक देखील लढवली होती आणि त्यामध्ये पाच लाख 9 हजार मते त्यांना मिळाली होती यावेळी मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षण आंदोलन आणि त्याविरुद्ध असलेला ओबीसी मधील आक्रोश कोणाच्या पथ्यावर पडणार हे लवकरच स्पष्ट होईल
Leave a Reply