पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह मान्यवर गैरहजर !
बीड- कोट्यवधी रुपये खर्च करून आयोजित केलेल्या बीड येथील महासंस्कृती महोत्सवाकडे बीडकरांनी पाठ फिरवली.उद्घाटक म्हणून आमंत्रित असलेले पालकमंत्री तथा कृषिमंत्री धनंजय मुंडे हे देखील कार्यक्रमाला गैरहजर होते.विभागीय आयुक्त मधुकर आर्दड यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन उरकण्यात आले.
राज्य शासनाच्या कृषी,महिला बाल कल्याण आणि ग्रामविकास विभागाच्या वतीने बीड येथे 24 ते 29 फेब्रुवारी दरम्यान महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाची माहिती आणि जनजागृती करण्यात जिल्हा प्रशासन कमी पडले.काही जवळच्या आणि मर्जीतील कलाकार आणि लोकांना या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली होती.त्यामुळे स्थानिकचे कलाकार देखील नाराज होते.
करोडो रुपये खर्च करून हा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र कार्यक्रमाच्या उदघाटनाला ना पालकमंत्री मुंडे आले ना बीडकर रसिक.हा कार्यक्रम लिमिटेड केल्याची भावना अनेकांनी बोलून दाखवली.
- कासलेची फेकाफेकी उघड!निवडणूक विभागाकडून गुन्हा दाखल!
- पोलीस पाटलांची भरती सुरु!
- आजचे राशीभविष्य!
- बडतर्फ कासले विरुद्ध पोलिसात तक्रार!
- आजचे राशीभविष्य!
या कार्यक्रमात वादळ वारे आल्याने उभारलेला मंडप ऐनवेळी कोसळला.त्यामुळे अनेक स्टोल कोसळले.काही महिला देखील किरकोळ जखमी झाल्या.मोठ्या प्रमाणावर स्टोल धारकांचे नुकसान झाले.
प्राप्त माहितीनुसार या कार्यक्रमाची सगळी रूपरेषा ही परळी येथून फायनल करण्यात आली.कोणते कलाकार बोलवायचे,त्यांना निमंत्रण कोणी द्यायचे,त्यांचे मानधन कोणी ठरवायचे हे सगळं परळीतून फायनल झाले.त्यामुळे स्थानिक कलाकारांना याची कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
Leave a Reply