बीड- कार्यकारी अभियंता पदावर असलेल्या आपल्याच साहेबांचे पगार बिल काढण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या लिपिकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
छत्रपती संभाजी नगर येथील प्रधानमंत्री ग्राम सडक योजना या कार्यालयात नोकरीस असलेले कार्यकारी अभियंता यांच्याकडे जून ते ऑक्टोबर 2023 या पाच महिन्याचे पगार बिल काढण्यासाठी प्रत्येक महिन्याचे दोन हजार याप्रमाणे दहा हजार रुपये लाच त्यांच्याच कार्यालयातील लिपिक शिवाजी ढोरमारे यांनी मागितली.
याबाबत बीडच्या लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी सापळा लावल्यानंतर ढोरमारे यांनी दहा हजार रुपये लाच स्वीकारताना त्यांना अटक करण्यात आली.
- बडतर्फ कासले विरुद्ध पोलिसात तक्रार!
- आजचे राशीभविष्य!
- ज्याला आई कळली त्याला धर्म कळला -कबीर महाराज!
- वाचाळ कासले डिसमिस!
- आजचे राशीभविष्य!
आपल्याच साहेबांना लाच मागणाऱ्या लिपिकाला अटक झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
Leave a Reply