News & View

ताज्या घडामोडी

महिलेचा विनयभंग करणारा शिक्षक निलंबित !

बीड- अपहार प्रकरणात निलंबित असताना कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करणाऱ्या रमेश नखाते या शिक्षकास सीईओ अविनाश पाठक यांनी निलंबित केले आहे.

26 लाखाचा भ्रष्टाचार आणि विविध गैरव्यवहाराचे आरोप असलेल्या माजलगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लमाणतांडा, शिंदेवाडी केंद्र नित्रुड येथे करत असलेल्या रमेश विष्णुपंत नखाते या पदवीधर शिक्षकाने एका कर्मचारी महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा र.नं. 06/ 2024 भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 354(अ) 354 (डी) 504 व 506 अन्वये दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी गुन्हा दाखल झाला होता.


याप्रकरणी बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पाठक यांनी शिक्षक रमेश नखाते याची कृती महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा वर्तणूक नियम 1967 मधील नियम (3) चा भंग करणारी असल्याचे जिल्हा परिषद सेवा शिस्त वापील 1984 मधील नियम (3) मधील तरतुदीनुसार रमेश नखाते प्राथमिक पदवीधर, जि.प.प्राथमिक शाळा लमाणतांडा शिंदेवाडी केंद्र नित्रुड याला सेवेतून निलंबित केले आहे. निलंबन सेवेत नखाते याला पंचायत समिती आष्टी हे मुख्यालय देण्यात आले आहे. रमेश नखाते यांनी यापूर्वी धारूर तालुक्यातील 26 लाखाच्या भ्रष्टाचार प्रकरणी यापूर्वी त्यांना निलंबित करण्यात आले होते याबाबत विभागीय चौकशी होऊन या प्रकरणातही संबंधिताला शिक्षा होणार असल्याचे समजते.

बडतर्फीची कारवाई होणार
रमेश नकाते याने धारूर तालुक्यातील 26 लाखाच्या आपहार प्रकरणे त्याच्याविरुद्ध दोषारोप दाखल करण्यात आले होते. त्यामुळे विभागीय चौकशीत संबंधिताला दोषी ठरविण्यात आले. दरम्यान दि.24 जानेवारी रोजी एका कर्मचारी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी रमेश नखाते याच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दि.8 फेब्रुवारी रोजी नखाते याला पुन्हा निलंबित केले आहे. याही प्रकरणात आयुक्तांसमोर सुनावणी होणार असल्यामुळे संबंधितावर बडतर्फीची कारवाईची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *