बीड- शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदावर अनिल दादा जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बीड आणि माजलगाव विधानसभा जिल्हाप्रमुख पदावर जगताप यांच्या नियुक्तीचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खा श्रीकांत शिंदे यांनी दिले.
9 जानेवारी रोजी अनिल जगताप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश घेतला होता. उबाठा गटाने त्यांची जिल्हाप्रमुख पदावरून सहसंपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती केल्यानंतर नाराज झालेल्या जगताप यांनी उबाठा सेनेला जय महाराष्ट्र केला होता.
त्यानंतर 9 जानेवारी रोजी हजारो समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश घेतला. जगताप यांनी पाचशे ते सातशे गाड्या घेऊन केलेला प्रवेश महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला होता.त्याचवेळी लवकरच अनिल जगताप वर मोठी जबाबदारी देण्याची घोषणा केली होती.
- कासलेची फेकाफेकी उघड!निवडणूक विभागाकडून गुन्हा दाखल!
- पोलीस पाटलांची भरती सुरु!
- आजचे राशीभविष्य!
- बडतर्फ कासले विरुद्ध पोलिसात तक्रार!
- आजचे राशीभविष्य!
दरम्यान 23 जानेवारी रोजी जगताप यांची बीड आणि माजलगाव मतदारसंघाचे जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल अनेकांनी अभिनंदन केले आहे.
Leave a Reply